थेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:33 AM2020-11-19T11:33:31+5:302020-11-19T11:35:39+5:30

muncipaltycarporation, kolhapurnews, water कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेतील प्रलंबित कामांचा कालबद्ध प्राधान्यक्रम ठरवून तत्काळ योजनेच्या कामाला गती द्या, अशा स्पष्ट सूचना महपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Accelerate the work of direct pipeline planning | थेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती द्या

कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी हर्षजित घाटगे, प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देथेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती द्या प्रशासक बलकवडे यांचे आदेश : योजनेच्या कामाची केली पाहणी

कोल्हापूर : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेतील प्रलंबित कामांचा कालबद्ध प्राधान्यक्रम ठरवून तत्काळ योजनेच्या कामाला गती द्या, अशा स्पष्ट सूचना महपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉ. बलकवडे यांनी बुधवारी काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी येथील जॅकवेल, राजापूर व नरतवडे येथील पाईपलाईन आणि पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी हर्षजित घाटगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव व वन विभाग व महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेवून प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी समयबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची सूचना बलकवडे यांनी दिली.

बलकवडे यांनी सुरुवातीस राधानगरी तालुक्यातील राजापूर येथील जॅकवेलच्या कामाचा आणि १८०० मिलिमीटर व्यासाच्या गुरुत्त्ववाहिनी पाईपलाईनच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. धरणक्षेत्रातील इन्स्पेक्शन वेल, इंटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल, इत्यादी कामे पूर्ण करण्याच्या कालावधीबाबत नियोजित वेळेचा बार चार्ट तयार करण्याची सूचनाही प्रकल्प अधिकारी यांना केली. तसेच वन विभागाशी संबंधित गट नंबर ५१ व गट नंबर १७४ मधील प्रलंबित कामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.

यावेळी उपजल अभियंता रामचंद्र गायकवाड, शाखा अभियंता संजय नागरगोजे तसेच योजनेचे तांत्रिक सल्लागार युनिटी कन्सल्टंट, पुणे यांचे प्रतिनिधी विजय मोहिते, आर. बी. पाटील आणि ठेकेदार जी.के.सी. प्रोजेक्टस लि.चे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी हे उपस्थित होते.
 

Web Title: Accelerate the work of direct pipeline planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.