96 hours in Ranjit Chile water | 96 तास रणजित चिले पाण्यात
96 तास रणजित चिले पाण्यात

ठळक मुद्देमहापुरात धावून आलेले ‘देवदूत’

महानगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख रणजित चिले आणि त्यांचे ३0 जवान सलग चार दिवस महापुराच्या पाण्यात राहून पूरग्रस्तांच्या बचावाकरिता काम करत होते. सोमवारी सायंकाळपासून चिले यांनी तीन पथकांतील ३0 जवानांना सोबत घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. गुरुवारपर्यंत दोन हजार लोकांना तराफे, बोटीतून बाहेर काढले. उपलब्ध साधनांच्या सहायाने ही मोहीम अखंड सुरू राहिली. शेवटी पथकातील जवानांना पायाला जखमा झाल्या. तीन लोकांना नंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व लोक सुरक्षितस्थळी पोहोचल्यावरच त्यांची मोहीम थांबली.


 


Web Title:  96 hours in Ranjit Chile water
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.