90 crore misconduct on 'social welfare' scholarship | ‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७ ०० कोटींचा गैरव्यवहार-: ‘एनएसयुआय’कडून चौकशीची मागणी
‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७ ०० कोटींचा गैरव्यवहार-: ‘एनएसयुआय’कडून चौकशीची मागणी

ठळक मुद्दे‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन शनिवारी ‘एनएसयुआय’तर्फे नायब तहसीलदार अनंत गुरव यांना देण्यात आले. यावेळी जयराज देसाई, करण चौगुले, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर : समाजकल्याण विभागामार्फत २०१० ते २०१८ या कालावधीत राज्यात शिष्यवृत्ती वितरणामध्ये १७०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे; त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय)च्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि. १६) जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबतचे निवेदन प्रदेश महासचिव जयराज धैर्यशील देसाई यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाकडून आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी, आदी संवर्गातील केवळ १२४३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले आहेत. शिक्षण संस्थांकडे चार लाख १६ हजार २५० अर्ज तपासणीसाठी पडून आहेत, तर शिक्षण संस्थांनी तपासून दिलेले ७८ हजार ८३४ अर्ज समाजकल्याणकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, तरी संस्थांनी तपासलेले वरील अर्ज मंजूर करून शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी. तसेच समाजकल्याणमधील २०१० ते २०१८ या काळातील शिष्यवृत्तीमध्ये १७०० कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी करावी.

यावेळी करण चौगुले, विशाल सुतार, निखिल शिंदे उपस्थित होते.

 

 

Web Title: 90 crore misconduct on 'social welfare' scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.