राधानगरी धरणातून 841 क्युसेक विसर्ग, 43 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:58 PM2021-06-17T12:58:19+5:302021-06-17T13:05:14+5:30

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

841 cusec discharge from Radhanagari dam, 43 dams under water | राधानगरी धरणातून 841 क्युसेक विसर्ग, 43 बंधारे पाण्याखाली

मान्सुनच्या पहिल्याच पावसात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी पात्राबाहेर पडली आहे. तेरवाड येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देराधानगरी धरणातून 841 क्युसेक विसर्ग43 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे व हळदी, तुळशी नदीवरील घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड, दुधगंगा नदीवरील सुळकूड व बाचणी, कासारी नदीवरील यवलूज, कुंभी नदीवरील सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, घटप्रभा नदीवरील कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली असे एकूण 43 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 31.67 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 25.070 इतका पाणीसाठा आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

तुळशी 48.84 दलघमी, वारणा 428.20 दलघमी, दूधगंगा 232.45 दलघमी, कासारी 25.74 दलघमी, कडवी 27.39 दलघमी, कुंभी 33.06 दलघमी, पाटगाव 47.34 दलघमी, चिकोत्रा 19.27 दलघमी, चित्री 23.99 दलघमी, जंगमहट्टी 9.95 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 19.08 दलघमी, आंबेआहोळ 2.61, कोदे (ल.पा) 2.50 दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.
राजाराम 24 फूट, सुर्वे 21.9 फूट, रुई 49 फूट, इचलकरंजी 47.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 24.6 फूट, राजापूर 14.6 फूट तर नजीकच्या सांगली 7 फूट व अंकली 7.3 फूट अशी आहे.

Web Title: 841 cusec discharge from Radhanagari dam, 43 dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.