उद्योगपती शेट्टींकडून गडहिंग्लजला ५ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:06 PM2021-08-02T13:06:10+5:302021-08-02T13:06:55+5:30

Flood Kolhapur : मुंबई येथील उद्योगपती नागराज शेट्टी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गडहिंग्लज शहरातील पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली. त्यातून पूरबाधितांसह सुमारे १ हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आले.

5 lakh assistance to Gadhinglaj from industrialist Shetty | उद्योगपती शेट्टींकडून गडहिंग्लजला ५ लाखाची मदत

 गडहिंग्लज शहरातील पूरबाधितांना सनी व रोमा शेट्टी यांच्याहस्ते मदत देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी व नगरसेवक उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देउद्योगपती शेट्टींकडून गडहिंग्लजला ५ लाखाची मदतपूरबाधितांसह सुमारे १ हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट

गडहिंग्लज : मुंबई येथील उद्योगपती नागराज शेट्टी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गडहिंग्लज शहरातील पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली. त्यातून पूरबाधितांसह सुमारे १ हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आले.

येथील गणेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, सनी शेट्टी व रोमा शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी नदीवेस, लाखेनगर, भीमनगर, दुंडगा मार्ग, मेटाचा मार्ग, शेंद्री रोड व भडगाव रोड या परिसरातील गरजूंना तांदूळ, आटा, साखर, डाळ, चहा पावडर व तेल आदी वस्तूंचे कीट वाटण्यात आले.

यावेळी नगरसेवक उदय पाटील, राजेश बोरगावे, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर, सुनिता पाटील, वीणा कापसे, शशीकला पाटील, शकुंतला हातरोटे, क्रांती शिवणे, प्रकाश तेलवेकर, प्रा. रमेश पाटील, बाळासाहेब भैसकर, दत्ता चव्हाण, बाळासाहेब माने, पापू कागे, राजू बस्ताडे, विनोद लाखे आदी उपस्थित होते.

पूरग्रस्तांचे हाल पाहून..!

उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी गडहिंग्लज शहरातील पूरबाधित कुटुंबांची दैनावस्थेची छायाचित्रे व माहिती उद्योगपती शेट्टी यांना पाठवली होती. ते पाहून त्यांचे मन हेलावून गेल्यामुळे त्यांनी तब्बल ५ लाखाची मदत पाठवली.


 

Web Title: 5 lakh assistance to Gadhinglaj from industrialist Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.