हेल्मेटअभावी २२१ दुचाकीचालकांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 04:34 PM2020-11-30T16:34:35+5:302020-11-30T16:41:20+5:30

bike, accident, police, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

221 cyclists lose their lives due to lack of helmets | हेल्मेटअभावी २२१ दुचाकीचालकांनी गमावला जीव

हेल्मेटअभावी २२१ दुचाकीचालकांनी गमावला जीव

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरात १० महिन्यांत ४०० हून अधिक दुचाकी अपघात हेल्मेटविना ९५ टक्के वाहनचालकांचा मृत्यू

तानाजी पोवार

कोल्हापूर : हेल्मेट असते तर...!!! पण हा विचार दुर्घटनेनंतरच मनात येतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते अन‌् अपघातात जीव गमावलेला असतो. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

डोक्याला हेल्मेट न घालता बहुतांश दुचाकीस्वार प्रवास करतात. दुचाकीचालकांनी व मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्याला हेल्मेट घालणे कायद्याने सक्तीचे आहेच; पण त्याची तितक्या तीव्रतेने अंमलबजावणी होत नाही. वाहनचालकांनाही त्याचे गांभीर्य वाटत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या प्रत्येक दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. कदाचित त्यांच्या डोक्याला हेल्मेट असते तर अपघातात ते जखमी झाले असते; पण त्यांच्यावर मृत्यूचे प्रसंग ओढवले नसते, असे दिसते.

महामार्गांवर अपघातांची मोठी संख्या

पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापुरातून कोकणला जोडणारे तीन राज्य महामार्ग आहेत. या मार्गांवरही दुचाकीचालकांची मोठी वर्दळ आहे. या मार्गांवर दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरीही त्याकडे पोलीस अथवा वाहनचालकांकडून गांभीर्याने पाहिले जात नाही; त्यामुळे या मार्गांवरच मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांचे अपघात होतात.


हेल्मेट नसल्यामुळे वाहन दुर्घटनेत बहुतांश २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे बळी गेलेल्यांची संख्या मोठी आहे, हेल्मेट न वापरणे म्हणजे आत्महत्या करण्याचाच प्रकार आहे. अपघातात अपंगत्व आले तरी केवळ हेल्मेट वापरल्याने डोके व जीवही सुरक्षित राहतो.
- डॉ. वीरेंद्रसिंह पोवार,
न्यूरो सर्जन, कोल्हापूर

Web Title: 221 cyclists lose their lives due to lack of helmets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.