राधानगरीतून १०००; अलमट्टीतून ३८,९२२ क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:25 PM2020-09-29T14:25:19+5:302020-09-29T14:28:38+5:30

कोल्हापूर : राधानगरी धरणात २३१.४६ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १०००, कोयनेतून ...

1000 from Radhanagari; 38,922 cusecs discharge from Almatti | राधानगरीतून १०००; अलमट्टीतून ३८,९२२ क्युसेक विसर्ग सुरू

राधानगरीतून १०००; अलमट्टीतून ३८,९२२ क्युसेक विसर्ग सुरू

Next
ठळक मुद्देराधानगरीतून १०००; अलमट्टीतून ३८,९२२ क्युसेक विसर्ग सुरूजिल्ह्यातील रूई व इचलकरंजी बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : राधानगरी धरणात २३१.४६ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १०००, कोयनेतून २००० तर अलमट्टी धरणातून ३८,९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील रूई व इचलकरंजी असे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात १०५.१५ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १२३.०८१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा 

तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 70.97 दलघमी, कुंभी 76.43 दलघमी, पाटगाव 105.17 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा 44.050 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

 बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम 14.9, सुर्वे 16.8 फूट, रुई 42.6 फूट, इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 38.3 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.6 फूट तर नजीकच्या सांगली 9 फूट व अंकली 9.9 फूट अशी आहे.


प्रमुख जिल्हा मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू आहे.

Web Title: 1000 from Radhanagari; 38,922 cusecs discharge from Almatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.