खुनाच्या दोन आरोपींना सव्वादोन वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:02 AM2020-11-20T00:02:27+5:302020-11-20T00:02:44+5:30

कुंदन जोशी हत्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

Two murder accused arrested after 12 years | खुनाच्या दोन आरोपींना सव्वादोन वर्षांनी अटक

खुनाच्या दोन आरोपींना सव्वादोन वर्षांनी अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जुलै २०१८ मध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीत कुंदन जोशी या ३२ वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. नऊ आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली होती. परंतु, तीन आरोपी फरार होते. यातील दोघांना विष्णुनगर पोलिसांनी सापळा लावून बुधवारी अटक केली. विशाल सुरेश गायकवाड (वय २४) आणि अरविंद कामता प्रसाद राय (वय २१) ही अटक आरोपींची नावे आहेत. आणखी एका आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करू, असा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी केला आहे.

व्हॉट्सॲपच्या मेसेजवरून दोन गटांंत हाणामारी झाल्याची घटना २९ जुलै २०१८ रोजी पश्चिमेकडील सखाराम कॉम्प्लेक्स रोडवर दुपारी पावणेतीनच्या दरम्यान घडली होती. या घटनेत कुंदन जनक जोशी यांचा मृत्यू, तर अन्य चौघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी कुंदन यांचे पुतणे रोहित विनोद जोशी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, तीन आरोपी अद्याप फरार होते. बुधवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत गस्त घालत असताना जोशी यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल गायकवाड आणि अरविंद कामता प्रसाद राय हे पश्चिमेतील शास्त्रीनगर भागात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे, पोलीस हवालदार युवराज तायडे, विनोद निकम, राजेंद्र बनसोडे, शशिकांत नाईकरे, पोलीस नाईक राजेंद्र पाटणकर, भगवान सांगळे, कुंदन भामरे, सचिन कांगूने आदींच्या पथकाने शास्त्रीनगर झोपडपट्टी, कोपर रोड परिसरात सापळा लावला. 

शनिवारपर्यंत कोठडी 
पोलिसांनी सापळा लावल्याची चाहूल लागताच दोघेही आरोपी पळू लागले. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात पथकाला यश आले. दोघांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Two murder accused arrested after 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून