अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:37 PM2021-07-28T17:37:22+5:302021-07-28T17:38:03+5:30

kalyan : जवळपास नऊ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने अंजली हॉस्पिटलचा (ऑक्झिलियम हेल्थकेअर) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. थकित वीजबिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही हॉस्पिटलने बिलाचा भरणा केला नाही.

Three lakh 58 thousand electricity theft from Anjali Hospital in kalyan | अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

googlenewsNext

कल्याण : थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या कल्याण पूर्व विभागातील अंजली हॉस्पिटलकडून (जूने नाव- ऑक्झिलियम हॉस्पिटल) तब्बल तीन लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व उपविभाग एक आणि भरारी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत ही वीजचोरी उघड झाली असून चोरीच्या विजेचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत हॉस्पिटलला नोटिस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत संबंधित रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी आवश्यक फिर्याद देण्यात येणार असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे.

जवळपास नऊ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने अंजली हॉस्पिटलचा (ऑक्झिलियम हेल्थकेअर) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. थकित वीजबिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही हॉस्पिटलने बिलाचा भरणा केला नाही. उलट पूर्वीचे नाव अंजली नावाने हॉस्पिटल सुरू असल्याचे आढळून आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता हॉस्पिटलची वीज जनरेटरवर वीज सुरू असल्याचे दर्शविण्यात आले. सलग पंधरा दिवस पाळत ठेवल्यानंतर हॉस्पिटलची बनवाबनवी उघडकीस आली. 
महावितरणरचे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये तपासणीला आले की, जनरेटरचा वापर व इतर वेळी विजेचा चोरटा वापर होत असल्याचे संयुक्त कारवाईत उघड झाले. तर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत हॉस्पिटलने तीन लाख ५८ हजार ३०० रुपये किंमतीच्या ११ हजार ५ युनिट विजेचा चोरटा केल्याचे निष्पन्न झाले. चोरीच्या विजेचे ३ लाख ५८ हजार व एक लाख ४५ हजार रुपये दंड भरण्याची नोटिस हॉस्पिटलला बजावण्यात आली आहे.

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल व अधीक्षक अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते व अमोल उके, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजवणी अधिकारी अतुल ओहळ, सहाय्यक अभियंता किरण इमाळी  यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
 

Web Title: Three lakh 58 thousand electricity theft from Anjali Hospital in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.