कल्याण-डोंबिवलीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:25 AM2021-01-09T01:25:10+5:302021-01-09T01:25:21+5:30

दोन आरोग्य केंद्रांत रंगीत तालीम : २० लाभार्थ्यांना पाठविले मेसेज

Successful dry run of covid vaccination in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

कल्याण-डोंबिवलीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे शुक्रवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील पाटकर आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली.


लसीकरण कशा प्रकारे करण्यात येईल, याची पूर्व तयारी म्हणून ही रंगीत तालीम मार पडली. त्यामुळे लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. केडीएमसीने २० लाभार्थी तयार करून त्यांना लसीकरणाच्या रंगीत तालमीसाठी मेसेज पाठविला होता, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी दिली.
निवडणूक पॅटर्नप्रमाणे कोविड लसीकरणाचा प्रक्रिया राबविली जाणार आहे. लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षक कक्ष याची रचना तयार करण्यात आली आहे.


पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सुरक्षारक्षक आणि तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आणि व्याधी ग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्याटप्प्याने दररोज १०० लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

ड्राय रनच्या वेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, डॉ.वैशाली काशीकर, डोंबिवलीचे उपायुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर आदी उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.किशोर चव्हाण यांनी ड्राय रनच्या वेळी नागरी केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले.


उल्हासनगरमध्ये ड्राय रनकडे लोकप्रतिनिधींची पाठ
nउल्हासनगर : महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणाचा ड्राय रन वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. शुक्रवारी झालेल्या ड्राय रनबाबत आरोग्य कर्मचारी व नागरिकांत उत्सुकतेचे वातावरण होते.  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधीपक्ष नेते, प्रभाग समिती सभापती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्राय रनकडे पाठ फिरविली होती.

nलसीकरणासाठी प्रतीक्षा, लसीकरण आणि निरीक्षक कक्ष अशी रचना तयार करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नोंदणी केलेल्या लाभार्थींचे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाणार आहे. ड्राय रनच्या वेळी डॉ.पगारे, डॉ.राजा रिजवानी यांच्यासह सहकारी डॉक्टर उपस्थित होते. 

Web Title: Successful dry run of covid vaccination in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.