डोंबिवलीतील विष्णूनगर जुन्या पोलिस ठाण्याच्या जागेत उभी राहणार सुसज्ज अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:48 PM2021-06-22T16:48:39+5:302021-06-22T16:48:51+5:30

माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश

Study center will be set up in the premises of Vishnunagar old police station in Dombivali | डोंबिवलीतील विष्णूनगर जुन्या पोलिस ठाण्याच्या जागेत उभी राहणार सुसज्ज अभ्यासिका

डोंबिवलीतील विष्णूनगर जुन्या पोलिस ठाण्याच्या जागेत उभी राहणार सुसज्ज अभ्यासिका

Next

कल्याण-डोंबिवली पश्चिमेतील स्टेशनजवळ असलेले जूने पोलिस ठाणे आनंदनगर ठाकूरवाडी येथील सुसज्ज इमारतीत चार वर्षापूर्वीच स्थलांतरीत करण्यात आले. मात्र जुन्या पोलिस ठाण्यातील जागा पडून होती. या जागेत सुसज्ज अभ्यासिका सुरु करण्यासाठी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा सुरु होता. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून या जागेत सुसज्ज अभ्यासिका उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

आज माजी नगरसेवक म्हात्रे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख सुभाष मुंडदा यांच्यासह शिवसेनेचे आशुतोष येवले, अभियंता महेश गुप्ते आदी उपस्थित होते. आनंदनगर ठाकूर वाडी येथील सर्व सामावेश आरक्षणांतर्गत वाचनालय आणि अभ्यासिकेसाठी जागा आरक्षित होती. त्या जागेत अभ्यासिकाच सुरु करण्यात यावी असा आग्रह म्हात्रे यांनी २०१६ साली धरला होता. मात्र तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी महापालिकेच्या माध्यमातून त्या जागेत पोलिस ठाणे स्थलांतरीत केले. ही जागा महापालिकेने विष्णूनगर पोलिस ठाण्यात दिली. मात्र अभ्यासिकेचा विषय बारगळला होता. त्यावेळी अभ्यासिकेच्या विकासासाठी महापालिकेने २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र जुने पोलिस ठाणे अभ्यासिकेच्या जागेत स्थलांतरीत झाले. पोलिस ठाण्याला नवी वास्तूही मिळाली. जुन्या पोलिस ठाण्याच्या दुस:या मजल्यावर डोंबिवली ग्रंथ संग्रहालय आहे. ते सगळ्य़ात जुने आहे. वाचन संस्कृती या संग्रहालयाने टिकवून ठेवली आहे.

कोरोना काळात ग्रंथालये बंद होती. पोलिस ठाण्याच्या पहिला मजल्यावर २ हजार ५०० चौरस फूटाची जागा आहे. या जागेची बाजारभाव मूल्य तीन कोटीच्या घरात आहे. पोसिस ठाण्यामुळे अभ्यासिकेची जागा हुकल्याने पहिल्या मजल्यावरील जागेत अभ्यासिका सुरु करण्यासाठी म्हात्रे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या जागेत सुसज्ज अभ्यासिका उभी राहणार आहे. तिच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी महापालिकेने ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या जागेत एकाच वेळी १०० विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतील. त्याठिकाणी वातानुकूलीत व्यवस्था असेल. ई लायब्ररीची सोय असेल. अभ्यासिका स्टेशन परिसरात असल्याने बाहेरील वाहनांचा आणि रहदारीच्या आवाजाने विद्याथ्र्याना त्रस होऊ नये यासाठी अभ्यासिका साऊंड प्रूफ असणार आहे. त्याचबरोबर विद्याथ्र्याच्या जेवणासाठी एक वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. त्याठीकाणी विद्यार्थी बसून त्याच्या जवळचा डबा खाऊ शकतो.

Web Title: Study center will be set up in the premises of Vishnunagar old police station in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.