आता प्रभाग कार्यालयातही होणार जनता दरबाराचे आयोजन! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:53 PM2021-11-25T16:53:41+5:302021-11-25T16:53:54+5:30

KDMC News: विभागीय उपआयुक्तांनी त्या  दिवशी  त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणेबाबत निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

Now Janata Darbar will be organized in ward office also! Kalyan-Dombivali Municipal Corporation took a big decision | आता प्रभाग कार्यालयातही होणार जनता दरबाराचे आयोजन! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय 

आता प्रभाग कार्यालयातही होणार जनता दरबाराचे आयोजन! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय 

Next

कल्याण - नागरिकांना  त्यांच्या विविध कामासाठी  महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या  सोयीसाठी,  त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरेने करणेकामी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करणेसाठी  आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला असून विभागीय उपआयुक्तांनी त्या  दिवशी  त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणेबाबत निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या   जनता दरबाराची  रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.पुढील आठवड्यापासून हा उपक्रम सुरू होणार आहे. 

 1/अ प्रभाग–बुधवार–दुपारी 3.00 ते 4. 00 – 1/अ प्रभाग कार्यालय

 2/ब प्रभाग– गुरुवार–दुपारी 4.00 ते 5.00  –  2/ब प्रभाग कार्यालय

 3/क प्रभाग– मंगळवार दुपारी 3.00 ते 4.00 – 3/क प्रभाग कार्यालय

 4/जे प्रभाग- बुधवार–दुपारी 4.00 ते  5.00 – 4/जे प्रभाग कार्यालय

 5/ड प्रभाग– बुधवार–दुपारी  3.00 ते 4.00 – 5/ड प्रभाग कार्यालय

 6/फ प्रभाग–बुधवार –दुपारी  3.00 ते 4.00 – 6/फ प्रभाग कार्यालय

 7/ह प्रभाग- गुरुवार-दुपारी  3.00 ते 4.00 – 7/ह प्रभाग कार्यालय

 8/ग प्रभाग– गुरुवार – दुपारी  4.00 ते 5. 00 – 8/ग प्रभाग कार्यालय

 9/आय प्रभाग–गुरुवार –दुपारी 4.00 ते 5. 00 – 9/आय प्रभाग कार्यालय

 10/ई प्रभाग– शुक्रवार – दुपारी 4.00 ते 5. 00 –10/ई प्रभाग कार्यालय

Web Title: Now Janata Darbar will be organized in ward office also! Kalyan-Dombivali Municipal Corporation took a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.