40 कामगारांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष, दोन महिने पगारही नाही, वीज कंत्राटी कर्मचारी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:45 PM2021-05-11T13:45:01+5:302021-05-11T13:45:22+5:30

वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम 

Ignoring the deaths of 40 workers, not even two months salary, power contract workers angry | 40 कामगारांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष, दोन महिने पगारही नाही, वीज कंत्राटी कर्मचारी संतप्त

40 कामगारांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष, दोन महिने पगारही नाही, वीज कंत्राटी कर्मचारी संतप्त

Next
ठळक मुद्देसरकारकडे अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जून 2020 पासून अनेक आंदोलने आणि पत्रव्यवहार करूनही अद्याप ऊर्जा खात्याकडून कोणताही निर्णय झालेला नाही

कल्याण - राज्य शासनाकडून विविध प्रलंबित मागण्यांवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने निषेध म्हणून राज्यातले वीज कंत्राटी कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करत आहेत. उपविभागीय कार्यालयांसह संपूर्ण राज्यभरात कंत्राटी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत असल्याचे कंत्राटी कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज मनुचारी यांनी सांगितले. 

सरकारकडे अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जून 2020 पासून अनेक आंदोलने आणि पत्रव्यवहार करूनही अद्याप ऊर्जा खात्याकडून कोणताही निर्णय झालेला नाही. याविरोधात आज राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहेत. कोरोना काळात या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा दिला. हे काम करत असताना 40 कंत्राटी कामगारांच्या झालेल्या मृत्यूकडे शासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे मनुचारी म्हणाले. 

राज्यात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली. मग वीज पुरवठ्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपल्या दोन ते तीन  महिने पगारासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचे सांगत कामगार संघटनेने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Ignoring the deaths of 40 workers, not even two months salary, power contract workers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.