एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:01 PM2022-09-01T16:01:44+5:302022-09-01T16:06:08+5:30

डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली असून टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती उभारली आहे. 

Ganeshotsav 2022 balaji angan Complex ganesh mandal decoration replica tata memorial hospital in dombivali | एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती

एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती

Next

कल्याण/डोंबिवली - गणपती बाप्पाचं आगमन झाल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित सार्वजनिक मंडळ विविध विषयांवरील लक्षवेधी देखावे तयार करत असतात. देखाव्यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं जातं. डोंबिवलीतगणेशोत्सवाच्या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली असून टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती उभारली आहे. 

कॅन्सर या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीत असणाऱ्या 'बालाजी आंगन कॉम्पलेक्स'ने पुढाकार घेतला आहे. २०२२च्या गणेशोत्सवात त्यांनी 'टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'ची उभारणी केली आहे. 'बालाजी आंगन कॉम्पलेक्स'चं गणेशोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे. गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर सांगतात, "दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही देखाव्यातून सामजिक संदेश देण्याचं प्रयत्न करत आहोत. या वर्षी आम्ही कॅन्सर या आजारावर आरास उभी करून कॅन्सर बदल जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत."

"आज हा आजार बहुतेक लोकांच्या घरी आहे. पण या आजारावरचे उपचार मर्यादित हॉस्पिटलमध्ये होतात. मुख्य म्हणजे त्या आजारावर उपचार करण्यासाठी  टाटा हॉस्पिटलचं योगदान खरंच मोलाचं आहे. सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिल ची उभारणं देखाव्यामध्ये केली आहे. हा देखावा उभा करण्याची संकल्पना ही रुपेश राऊत, अभिजित बिल्ले, सुशांत भोवड, ओमकार वायंगणकर यांची आहे"

"१९४१ सली सुरू झालेल्या या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने कॅन्सर या आजाराने बाधीत रुग्णांना जीवन दान दिलं आहे. कॅन्सरचे उपचार समान्य माणसांना परवडतील असे हे एकमेव हॉस्पिटल अहे. कल्याण-डोंबिवलीत अशा एका हॉस्पिटलची खरच खूप गरज आहे जेणे करून भविष्यात कसारा-कर्जत-नाशिकडून येणाऱ्या रुग्णांसाठीसाठी हे एक मध्य ठिकाण बनेल" असंही प्रवीण केळुस्कर यांनी म्हटलं आहे. 

कॅन्सरविषयी जनजागृती आणि टाटा मेमोरीयल रुग्णालयाचा देखावा तेजस सौंदणकर, दिव्यांश सिंघ, स्वप्नील घाडी, राहुल दळवी, मंगेश तेली या कलाकारांनी उभा केला आहे. या कलाकारांना विनय हडकर, हिमांशू ढंग, प्राजक्ता केळुस्कर, यशश्री राऊत, सोनाली उकर्डे , विशाल साळवे, प्रथमेश मेस्त्री, शुभम सावंत यांनी मदत केली आहे. 


 

Web Title: Ganeshotsav 2022 balaji angan Complex ganesh mandal decoration replica tata memorial hospital in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.