डोंबिवली : ... अन एमआयडीसीतील ज्येष्ठ नागरिक सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:46 PM2021-06-22T18:46:32+5:302021-06-22T18:46:59+5:30

वादळ्याच्या तडाख्यामुळे कोसळली होती संरक्षक भिंत.

Dombivali Senior citizens of MIDC are happy got damaged wall in good condition shrikant shinde | डोंबिवली : ... अन एमआयडीसीतील ज्येष्ठ नागरिक सुखावले

डोंबिवली : ... अन एमआयडीसीतील ज्येष्ठ नागरिक सुखावले

googlenewsNext
ठळक मुद्देवादळ्याच्या तडाख्यामुळे कोसळली होती संरक्षक भिंत.

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात वादळाच्या तडाख्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सभागृहाबाहेरची संरक्षक भिंत कोसळली होती. ही घटना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना समजल्यावर त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पुन्हा भिंत पूर्वस्थितीत आणण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाचा आज श्री गणेशा करण्यात आला. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

खासदार शिंदे यांना भिंत पडल्याचे समजताच त्यांनी शहर प्रमुख राजेश मोरे  खासदार कार्यालय प्रमुख प्रफुल देशमुख यांनी  यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या दोघांनीही खासदारांच्या सूचनेनुसार घटना स्थळी भेट देउन पहाणी केली व ही भिंत पूर्वस्थीतीत आणण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली.  

यावेळी माजी विभागप्रमुख, जागरूक नागरिक  राजू नलावडे, उपतालुका व परिवहन सदस्य बंडू पाटील व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते. "संघाकडे निधीची तरतुदी नसल्यामुळे आम्ही खर्च कसा करायच्या या विवंचनेत होतो पण आता हे काम खासदार शिंदे  करून देत आहेत यामुळे आम्ही आनंदीत आहोत," असे मत ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य पावसकर यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Dombivali Senior citizens of MIDC are happy got damaged wall in good condition shrikant shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.