Coronavirus Vaccination : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी लसीकरण नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:41 PM2021-06-29T22:41:55+5:302021-06-29T22:42:36+5:30

Covid 19 Vaccine : लससाठा उपलब्ध न झाल्यानं कल्याण-डोंबिवलीत उद्या लसीकरण बंद.

Coronavirus Vaccination No vaccination on Wednesday in Kalyan Dombivali | Coronavirus Vaccination : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी लसीकरण नाही 

Coronavirus Vaccination : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी लसीकरण नाही 

googlenewsNext
ठळक मुद्देलससाठा उपलब्ध न झाल्यानं कल्याण-डोंबिवलीत उद्या लसीकरण बंद.

शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाने  दिली आहे. या महिन्यात पाचव्यांदा अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. 

एकीकडे शेजारील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरू असताना कल्याणडोंबिवली मध्ये मात्र लसीकरण प्रक्रिया वारंवार बंद ठेवावी लागत आहे.  त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असून  वरिष्ठ पातळीवर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न करावे अशी अपेक्षा कल्याण  डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत.

Web Title: Coronavirus Vaccination No vaccination on Wednesday in Kalyan Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.