कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खासगी डॉक्टरांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 07:34 PM2022-01-06T19:34:20+5:302022-01-06T19:34:37+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

corona patients doubles in Kalyan Dombivali Commissioner held a meeting of private doctors | कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खासगी डॉक्टरांची बैठक

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खासगी डॉक्टरांची बैठक

googlenewsNext

कल्याण-

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.या पाश्र्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली. त्यात विशेष करुन स्त्रीरोग आणि बालरोग तज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. कारण आढळून येणा:या रुग्णांमध्ये मुले आणि गरोदर महिलांचा समावेश जास्त दिसून येत आहे. या परिस्थिती घाबरून न जाता लक्षणो जाणवताच प्रत्येकाने टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन महापालिका अयुक्तांनी केले आहे.

महापालिका हद्दीतील नागरीकांमध्ये कोरोना टेस्ट करुन घेण्याविषयी भिती आहे. कारण नागरीकांना वाटते की, टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात भरती केले जाईल. ज्यांच्या घरी होम आयसोलेशनचे व्यवस्था आहे. त्यांना रुग्णालयात भरती होण्याची सक्ती केली जाणार नाही.

महापालिकेने कोरोना टेस्ट वाढविल्या आहेत. दिवसाला तीन हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. महापालिकेची स्वत:ची आणि पीपीपी तत्वावर चालविली जाणारी कोरोना टेस्ट लॅबमध्ये दिवसाला सहा हजार जणांनी कोरोना टेस्ट केली जाऊ शकते अशी माहिती आयुक्तांनी दिली. आज खाजगी डॉक्टरांची व्हीसी आयुक्तांनी घेतली. त्याला शहरातील 75 खाजगी डॉक्टर उपस्थित होते. महापालिकेच्या लॅब आणि कलेक्शन सेंटरमधून कोरोना चाचणी केली जात आहे. खाजगी लॅबना त्यांचे कलेक्शन सेंटर वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

एखादी गरोदर महिला पॉझीटीव्ह आल्यास तिची धावपळ होणार नाही तिला त्रस होणार नाही अशा पद्धतीने तिच्यावर उपचार केल जावेत. तसेच एखाद्या मुलाला कोरोना झाल्यास त्याच्या घरी सोय असल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्याची सक्ती करता कामा नये अशा सूचना दिल्या डॉक्टरांना दिल्या आहे. काल देखील आयुक्तांनी फॅमिलि डॉक्टरांची बैठक घेऊन लक्षणो आढळून येणा:या रुग्णाला टेस्ट करण्यासाठी तातडीने सेंटरला पाठवावे असे सूचित केले आहे. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी  हॉस्पीटलाईज होण्याचा रेट हा ेएक टक्का आहे. ज्या नागरीकांनी लसीकरण केले नाही. ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांनी दुसरा डोस घ्यावा. महापालिका हद्दीत 15 ते 18 वयोगटातील विद्याथ्र्याचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु झाले. आत्तार्पयत 38 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: corona patients doubles in Kalyan Dombivali Commissioner held a meeting of private doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.