विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:39 PM2021-08-29T15:39:02+5:302021-08-29T15:39:28+5:30

Kalyan : गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार बंद झाला असून त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Appeal for financial support from the school for the further education of the students | विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन 

विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन 

googlenewsNext

कल्याण : कोरोना काळात  एकंदरीत सर्व चित्र पालटले आहे. अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. यामुळे अनेक कुटुंबीयांचे आर्थिक बजेट कोलमडले. आपल्या पाल्याची  फी भरण्यासाठी देखील पालकांना अनेक अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्यामुळे कल्याणमधील बालक मंदिर संस्थेकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार बंद झाला असून त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे विद्यार्थी हुशार असल्याने त्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेतर्फे मदत केली जात असली तरी अद्यापही आणखी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळेतील माजी विद्यार्थी, समाजातील दानशूर व्यक्ती, हितचिंतक आदींनी या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून पुढे येण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

कल्याणातील बालक मंदिर संस्था, इंग्लिश माध्यम, माध्यमिक शाळा म्हणजे इंदुताई देवधर यांनी 1949 साली लावलेलं लहानसे रोपटे. पुढे या रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला. बदलत्या काळाच्या गरजेनुसार संस्थेने इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरु केल्या.तरी या  शाळेत संस्कृती, संस्कार आणि मूल्यांची जपणूक  केली जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क :- भाग्यश्री कुलकर्णी 90041 28040 / त्रिवेणी शिंपी  86527 39033.

Web Title: Appeal for financial support from the school for the further education of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.