Pro Kabaddi League 2018: अखेरच्या सेकंदापर्यंत रंगला दिल्ली आणि गुजरात सामन्याचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:56 PM2018-10-09T20:56:03+5:302018-10-09T21:11:06+5:30

दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन करत दबंग दिल्ली संघाने गुजरात फॉर्च्यूनजायंट्सबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला.

Pro Kabaddi League 2018: The thrill of Delhi and Gujarat match till the last seconds | Pro Kabaddi League 2018: अखेरच्या सेकंदापर्यंत रंगला दिल्ली आणि गुजरात सामन्याचा थरार

Pro Kabaddi League 2018: अखेरच्या सेकंदापर्यंत रंगला दिल्ली आणि गुजरात सामन्याचा थरार

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या सत्रात गुजरातने १७-१२ अशी पाच गुणांची आघाडी घेतली होती.

चेन्नई : दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन करत दबंग दिल्ली संघाने प्रो-कबड्डी लीगमधील गुजरात फॉर्च्यूनजायंट्सबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला. पहिल्या सत्रात गुजरातने १७-१२ अशी पाच गुणांची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात दिल्लीने दमदार खेळ केला आणि सामना ३२-३२ असा बरोबरीत सोडवला.



 

दिल्लीच्या संघाने दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन केले. सामना अखेरच्या पाच मिनिटांमध्ये त्यांनी गुजरातचा सर्व संघ बाद केला. त्यानंतर चार मिनिटे शिल्लक असताना २९-२९ अशी बरोबरी केली. त्यानंतर सामना संपायला एक मिनिट असताना दिल्लीने पुन्हा एकदा ३१-३१ अशी बरोबरी केली. 

 पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये पाच गुणांचा फरक होता. पहिल्या सत्रात गुजरातने दिल्लीवर १७-१२ अशी आघाडी मिळवली होती. पहिल्या सत्रात गुजरातने दिल्लीवर एक लोण चढवला होता. 


सामन्याच्या सुरुवातीपासून गुजरातच्या संघाने दिल्लीवर वरचष्मा ठेवला होता. मध्यंतरापर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवली होती.


Web Title: Pro Kabaddi League 2018: The thrill of Delhi and Gujarat match till the last seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.