माश्याला जाळ्यात अडकवायला गेला पण माश्याचाच जाळ्यात असा अडकली की जीव जाणारच होता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:34 PM2021-09-02T12:34:08+5:302021-09-02T12:35:00+5:30

अनेकदा मासेमारी उलट आपल्यावरच बेतते, याचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. सध्या मासेमारीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

young boy doing fishing catches fish but fish pulls boy into water | माश्याला जाळ्यात अडकवायला गेला पण माश्याचाच जाळ्यात असा अडकली की जीव जाणारच होता

माश्याला जाळ्यात अडकवायला गेला पण माश्याचाच जाळ्यात असा अडकली की जीव जाणारच होता

Next

मासे (Fish video) खायला किती तरी जणांना आवडतं आणि हे मासे स्वतः पकडलेले (Fishing video) असतील तर ती खाण्याची मजा काही औरचं. पण अनेकदा मासेमारी उलट आपल्यावरच बेतते, याचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. सध्या मासेमारीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण तलावाच्या किनाऱ्यावर बसून मासे पकडतो आहे. लोरेंट स्जाबो असं या तरुणाचं नाव आहे. त्याने पाण्यात टाकलेल्या गळाला थोड्या वेळाने मासा अडकतो. मासा पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तो आपली पूर्ण ताकद पणाला लावतो. पण मासा इतका मोठा होता की तो बाहेर येण्याऐवजी तरुणालाच तो पाण्यात खेचून घेतो. तरुण हळूहळू पूर्ण पाण्यात बुडतो.

तरुणाचं पाण्यात काय झालं असेल, अशीच भीती वाटते. पण सुदैवाने थोड्या वेळाने तरुण पाण्यातून बाहेर येतो.  ही घटना सोमोगी काऊंटीतील असल्याचं सांगितलं जातं आहे. युट्यूबवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

नेटिझन्सना हा व्हिडीओ पाहून धडकीच भरली आहे. त्याच्या गळाला मोठी कॅटफिश लागली होती.  बहुतेकांनी सुदैवाने ती फक्त एक कॅटफिश होती. मगर असती तर काय झालं असतं, अशी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: young boy doing fishing catches fish but fish pulls boy into water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.