एका मिनिटात रुप बदलते ही महिला, पाहुन तुम्हाला प्रश्न पडेल; भुताटकी तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:46 PM2021-11-29T13:46:04+5:302021-11-29T13:47:54+5:30

एक क्विक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ (Quick transformation video) सध्या नेटिझन्सच्या चर्चेचा विषय ठरत आहे. फोटोमध्ये दिसणारी महिला काही क्षणांमध्येच आपलं रूप असं काही बदलते, की सुरुवातीला आणि शेवटी असणारी महिला एकच आहे यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार होत नाहीये.

woman transform herself within 1 minute netizens are shocked | एका मिनिटात रुप बदलते ही महिला, पाहुन तुम्हाला प्रश्न पडेल; भुताटकी तर नाही ना?

एका मिनिटात रुप बदलते ही महिला, पाहुन तुम्हाला प्रश्न पडेल; भुताटकी तर नाही ना?

googlenewsNext

सोशल मीडियावर कित्येक प्रकारचे व्हिडीओ पाहत असतो. त्यातच टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्समुळे शॉर्ट व्हिडीओजचं (Short videos on Social media) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशा व्हिडीओजमध्ये ‘ट्रान्सफॉर्मेशन’चे अनेक व्हिडीओ (Transformation videos) व्हायरल झाले आहेत. असाच एक क्विक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ (Quick transformation video) सध्या नेटिझन्सच्या चर्चेचा विषय ठरत आहे. फोटोमध्ये दिसणारी महिला काही क्षणांमध्येच आपलं रूप असं काही बदलते, की सुरुवातीला आणि शेवटी असणारी महिला एकच आहे यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार होत नाहीये.

ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओजमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती दाखवली जाते आणि काही क्षणांमध्ये त्या व्यक्तीचंच बदललेलं रूप दाखवण्यात येतं. यात बऱ्याच वेळा मेकअपने केलेलं ट्रान्सफॉर्मेशन दाखवतात, तर कित्येक वेळा व्हिडीओ एडिटिंग किंवा जिम जॉइन केल्यानंतरचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं जातं. कॅनडाच्या क्लो फाउंटनने मेकअप ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडीओ (Cloe fountain tiktok) टिकटॉकवर अपलोड केला आहे.

सुरुवातीला जी महिला दिसते, तिच्या चेहऱ्यावर कसलाही मेकअप नाही. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येत आहेत. तसंच तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली आहेत आणि तिचे केसही पांढरे आहेत. यानंतर क्षणातच या महिलेचं दुसरं रूप (Woman quick transformation) समोर येतं, ज्यात तिच्या चेहऱ्यावर तेज आहे, तिला परफेक्ट जॉलाइन आहे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही गायब झाल्या आहेत. क्लोने आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, 'मेकअपच्या साहाय्याने कसलंही ट्रान्सफॉर्मेशन (Makeup transformation tiktok) करता येतं. या दोन्ही वेगवेगळ्या नाहीत, तर एकच महिला आहे.'

हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटिझन्स भलतेच चकित झाले आहेत. कित्येकांनी या दोन वेगवेगळ्या महिलाच असल्याचं म्हटलं आहे. कित्येक जणांनी या व्हिडीओमध्ये आजी आणि नात दाखवली असल्याचं म्हटलं आहे, तर अनेकांनी या दोघी मायलेकी असाव्यात असा अंदाज बांधला आहे. ज्यांनी या दोन्ही महिला एकच असल्याचं मान्य केलं, त्यांनी या ट्रान्सफॉर्मेशनचं क्रेडिट व्हिडीओ फिल्टर्सना (video filters) दिलं आहे. ही केवळ मेकअपची नाही, तर कॅमेरा फिल्टरची कमाल असल्याचंही अनेक जण म्हणत आहेत.

आधी अगदीच वृद्ध अशी वाटणारी महिला दुसऱ्याच क्षणाला तिशीतली आणि आकर्षक वाटते, हे पाहून अनेकांना आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. क्लोने मात्र ही मेकअपचीच कमाल असल्याचं म्हटलं आहे. मेकअपच्या साहाय्याने आपण ही किमया साधल्याचं क्लोनं स्पष्ट केलं आहे.

Web Title: woman transform herself within 1 minute netizens are shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.