बाबो! पतीसोबत घटस्फोटानंतर ३० वर्षीय महिलेनं सासऱ्यासोबत थाटला संसार,अन् नवरा म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:08 PM2021-04-21T19:08:40+5:302021-04-21T19:11:04+5:30

या महिलेनं 60 वर्षीय चुलत सासऱ्याशी लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

A woman marries her father in law after he emotionally supported him during her divorce | बाबो! पतीसोबत घटस्फोटानंतर ३० वर्षीय महिलेनं सासऱ्यासोबत थाटला संसार,अन् नवरा म्हणाला...

बाबो! पतीसोबत घटस्फोटानंतर ३० वर्षीय महिलेनं सासऱ्यासोबत थाटला संसार,अन् नवरा म्हणाला...

Next

अनेकदा घटस्फोट झाल्यानंतर आपलं आयुष्य पुन्हा खुलवण्यासाठी लोक दुसरं लग्न करतात. तर काहीजण पुन्हा सेम अनुभव येऊ नये म्हणून लग्न न करणंच पसंत करतात. पण अमेरिकेत एका महिलेनं लग्न मोडल्यानंतर भलताच प्रकार केला आहे.  केंटुकीमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय एरिका क्विग्गने (Erica Quiggle) दुसऱ्या कोणाशी नाही तर आपल्या चुलत सासऱ्याशी  लग्न केलं आहे. क्विग्गचं आपले पती जस्टिन टॉवेल यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. या महिलेनं 60 वर्षीय चुलत सासऱ्याशी लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

'द सन’ नं दिलेल्या माहितीनुसार एरिका क्विग्ग हिने 19 वर्षांची असताना स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिन टॉवेल याच्याशी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलंदेखील झालं. त्यानंतर या दोघांमध्येही वाद व्हायला लागले. नाईलाजानं या दोघांनी घटस्फोट घेतला.

भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!

तर चुलत सासऱ्यांनी महिलेला लग्नासाठी विचारले. काही वेळापर्यंत एरिकाने या  लग्नाचा स्वीकार केला नाही, मात्र त्यानंतर  आपल्यापेक्षा  जवळपास ३० वर्ष मोठ्या असलेल्या ससासऱ्याशी लग्न  करण्यास तयार झाली. दरम्यान एरिकाचा पहिला पती जस्टिननेही दुसरं लग्न केलं आहे. आणि दोन्ही मुलांची कस्टडी त्यांना वाटून घेतली आहे.

मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर...

एरिकानं दिलेल्या माहितीनुसार जेफ वयस्कर असला तरी अजूनही त्याचं मन तरुण आहे दोन्ही कुटुंबीय जवळपास मात्र वेगवेगळे राहतात. महिलेचा पहिला पती जस्टिनने सांगितलं की, आमच्या मनात एकमेकांविषयी वाईट विचार नाही. आम्ही आपापल्या आयुष्यात आता खूप खुश आहोत.
 

Web Title: A woman marries her father in law after he emotionally supported him during her divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.