राग आल्यावर काही लोकांना रडायला का येतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 11:45 AM2020-01-08T11:45:18+5:302020-01-08T11:57:23+5:30

काही लोकांना अजिबातच रडायला येत नाही आणि काही लोकांचं हे महत्वाचं शस्त्र असतं. तर काही लोक असेही असतात ज्यांना गोष्टी गोष्टीवर रडायला येतं.

Why some people cry in their anger? | राग आल्यावर काही लोकांना रडायला का येतं?

राग आल्यावर काही लोकांना रडायला का येतं?

Next

(Image Credit : aconsciousrethink.com)

काही लोकांना अजिबातच रडायला येत नाही आणि काही लोकांचं हे महत्वाचं शस्त्र असतं. तर काही लोक असेही असतात ज्यांना गोष्टी गोष्टीवर रडायला येतं. कधी गाणं ऐकून, कधी सिनेमा बघून तर कधी काही चांगलं खायला न मिळाल्याने. तसेच काही लोक असेही असतात जे खूप राग आल्यावर हुंदके देऊन देऊन रडतात. असे काही लोक तुमच्याही ओळखीचे असतीलच. पण त्यांच्यासोबत असं का होतं याच उत्तर जाणून घेऊया...

राग एक कॉम्प्लिकेटेड भावना

(Image Credit : everydayhealth.com)

रागाच्या भरात काही लोक स्फोटक स्वभावाचे होतात, तेच काही लोक रागात रडू लागतात. प्रत्येकाची रागाची वेगवेगळी पद्धत असते. आणि जर तुम्हाला वाटतं की, रागात रडल्यावर तुम्ही कमजोर होऊ लागता तर आजच हा विचार डोक्यातून काढून टाका. 

(Image Credit : nbcnews.com)

काही लोक रागात वस्तुंची तोडफोड करू लागतात. वाईटसाईट बोलतात, ओरडतात आणि काही लोक ओरडण्याऐवजी रागात भावूक होतात. विज्ञानाला यामागच्या कारणांचा पूर्णपणे शोध घेता आलेला नाही, पण काही थेअरी आहेत.

(Image Credit : verywellmind.com)

रडणं एक अशी रिअ‍ॅक्शन आहे ज्यावर लोकांचा नेहमीच कंट्रोल नसतो. रडणं एक Physiological Reaction आहे. याला फ्लशिंग किंवा स्वेटिंग प्रकारेही बघितलंही जाऊ शकतं.

काही संशोधकांचं मत आहे की, रडून व्यक्ती स्वत:ला कठिण वेळेत शांत ठेवतात. दु:खात आपण रडतो, कारण दु:खाचा तो क्षण आपल्यासाठी फार इंटेन्स असतो. दु:खं एक इंटेन्स रिअॅक्शन आहे. राग आणि फ्रस्ट्रेशन सुद्धा इंटेन्स इमोशन आहे. आणि रागात रडणे ही एक Physiological Reaction आहे. 

(Image Credit : iflscience.com)

एका रिपोर्टनुसार, मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे की, आपण रागात रडतो, कारण रागाच्या भावनेत आपण आतून दु:खीही असतो. आपल्याला राग तेव्हाच येतो जेव्हा एखाद्याच्या वागण्याने आपल्या मनाला ठेच लागते. त्यामुळे रागात रडायला येणाऱ्यांना वाईट वाटून घेण्याची अजिबातच गरज नाही.


Web Title: Why some people cry in their anger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.