भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 10:47 AM2021-03-24T10:47:14+5:302021-03-24T10:48:22+5:30

जयललिता यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील एक फोटो म्हणजे काळ्या साड्यातील हैराण दिसत असलेल्या जयललिता यांचा फोटो.

When Jayalalithaa was assaulted in the Tamil Nadu legislative assembly | भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो!

भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो!

googlenewsNext

जे. जयललिता दक्षिण भारतातील राजकारणातील एक मजबूत नेत्या होत्या. त्यांचा दबदबा दिल्लीपर्यंत होता. त्या इतक्या पॉवरफुल होत्या की, त्यांना एकेकाळी किंगमेकर म्हटलं जातं होतं. त्यांनी रूपेरी पडदा सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. पण हे मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. 

जयललिता यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील एक फोटो म्हणजे काळ्या साड्यातील हैराण दिसत असलेल्या जयललिता यांचा फोटो. हा फोटो त्या काळात फार गाजला होता. आताच्या भाषेत व्हायरल झाला होता. 

जयललिता यांचा हा फोटो १९८९ मधील आहे. त्या त्यावेळी विधानसभेच्या एका सत्रात सहभागी झाल्या होत्या. २५ मार्च १९८९ चा दिवस. विधानसभेत राज्याचं बजेट सादर केलं जात होतं. जयललिता तेव्हा विरोधीपक्ष नेत्या होत्या. त्या हे पद मिळणाऱ्या तामिळनाडूतील पहिल्या महिला होत्या.

(Image Credit : Indian Express)

त्यावेळी करूणानिधी हे मुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्रीही तेच होते. ते बजेट सादर करत होते त्यावेळी जयललिता यांनी त्यांचा विरोध केला. अशात कुणीतरी करूणानिधी यांच्यावर फाइल फेकली आणि त्यांचा चष्मा तुटला. दोन पक्षांमध्ये हाणामारी सुरू झाला. DMK नेत्यांनी जयललिता यांना घेरलं.

जयललिता यांनी घेतली होती शपथ

यादरम्यान DMK नेता दुरई मुरगन यांनी जयललिता यांची साडी खेचली होती आणि कुणीतरी जयललिता यांच्या डोक्यावर मारले होते. जयललिता फाटलेल्या साडीत कशातरी बाहेर निघाल्या. तेव्हा त्यांना जाता जाता शपथ घेतली होती की, त्या विधानसभेत तेव्हाच पाय ठेवतील जेव्हा त्या मुख्यमंत्री बनतील. त्यांचा हा फोटो पाहून त्यांचे चाहते आजही रडू लागतात. हा फोटो इंडियन एक्सप्रेसचा फोटोग्राफर शिवारमनने क्लिक केला होता.

रेकॉर्ड जागांवर मिळवला होता विजय 

नंतर त्यांनी जयललिता यांच्या ऑफिसमध्ये जाऊन या स्टोरीचा फॉलोअपही घेतला होता. तेव्हा जयललिता यांनी सांगितले होते की, कशाप्रकारे विधानसभेत त्यांच्यासोबत गैरवर्तन झालं. या घटनेनंतर जयललिता यांनी जोरात प्रचार सुरू केला होता. त्यांच्यासोबत झालेल्या घटनेचा त्यांना १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीत फायदा झाला. त्यांना लोकांची सहानुभूती मिळाली होती.

तेव्हा त्या रेकॉर्ड २२५ जागा जिंकून विधानसभेत पोहोचल्या होत्या. AIADMK ने त्यावेळी निवडणूक कॉंग्रेससोबत मिळून लढली होती. यावेळी जयललिता या मुख्यमंत्री बनल्या होत्या. सीएम झाल्यवर त्यांनी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. 
 

Web Title: When Jayalalithaa was assaulted in the Tamil Nadu legislative assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.