नशीबवान! ९० पैशात खरेदी केलेल्या वस्तुमुळे व्यक्ती बनला लखपती, जाणून घ्या पूर्ण किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:15 PM2021-07-30T19:15:32+5:302021-07-30T19:19:08+5:30

ही घटना लंडनची आहे. जिथे रस्त्यांवर लागणाऱ्या मार्केटमधून एका व्यक्तीने एक जुना चमचा खरेदी केला. हा फारच जुना वाकलेला चमचा होता.

UK man bought an old spoon at cost of 90 paisa now he sell spoon worth Rs 2 lakhs | नशीबवान! ९० पैशात खरेदी केलेल्या वस्तुमुळे व्यक्ती बनला लखपती, जाणून घ्या पूर्ण किस्सा...

नशीबवान! ९० पैशात खरेदी केलेल्या वस्तुमुळे व्यक्ती बनला लखपती, जाणून घ्या पूर्ण किस्सा...

googlenewsNext

कुणाचं नशीब कसं बदलेल हे सांगता येत नाही. कधी कुणी रोडपतीचा करोडपती बनतो तर कधी कुणी करोडपती रोडपती बनतो. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका व्यक्तीचं नशीब एका चमच्याने बदललं. असं की, त्याने याची कल्पनाही केली नसेल.

ही घटना लंडनची आहे. जिथे रस्त्यांवर लागणाऱ्या मार्केटमधून एका व्यक्तीने एक जुना चमचा खरेदी केला. हा फारच जुना वाकलेला चमचा होता. पण ते म्हणतात ना हिऱ्याची ओळख सोनारच करू शकतो. व्यक्तीला चमचा बघताच याची जाणीव झाली होती की, या चमच्यात काही खास आहे. हा चमचा त्याने केवळ ९० पैशात खरेदी केला होता. पण त्याने जेव्हा हा चमचा विकण्यासाठी ऑनलाइन टाकला तेव्हा त्याचा अंदाज बरोबर ठरला. या चमच्याच्या बदल्यात त्याला लाखो रूपये ऑफर करण्यात आले. (हे पण वाचा : टाइमपाससाठी महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकिट अन् बनली करोडपती!)

सुरूवातीला या चमच्याची किंमत ५२ हजार  रूपये मिळेल असा अंदाज होता. पण जेव्हा याचा लिलाव करण्यात आला तेव्हा हळूहळू त्याची बोली वाढत गेली. अखेर या चमच्याची फायनल बोली १ लाख ९७ हजार रूपये फायनल झाली. टॅक्स आणि एक्स्ट्रा चार्जेस जोडून याची किंमत २ लाख रूपयाच्या वर गेली.

चमचा विकणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख लपवून ठेवली आहे. पण त्याची स्टोरी चमच्याचा लिलाव करणाऱ्या कंपनीने शेअर केली. असं सांगितलं जात आहे की, ही व्यक्ती नेहमीच कार बूड मार्केटमध्ये जात होता. चमचा खरेदी केल्यावर त्याने Somerset च्या सिल्वर एक्सपर्ट Lawrences Auctioneers सोबत संपर्क केला. त्याने व्यक्तीला चमचा किंमती असल्याचं सांगितलं.

ऑक्शन हाउसचे अलेक्स बुचरने सांगितलं की, चमचा १३व्या शतकातील आहे आणि याची किंमत लाखो रूपये आहेत. हा चमचा ५ इंच लांब आहे. सोबतच याचं डिझाइन रोमन यूरोपियन स्टाइलचा आहे. तो वाकडा झाला होता. असं वाटत आहे की, हा चमचा अनेक वर्षापासून पाणी किंवा जमिनीखाली दबला होता. 
 

Web Title: UK man bought an old spoon at cost of 90 paisa now he sell spoon worth Rs 2 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.