काय सांगता! 'या' देशात चक्क 'कोरोना व्हायरस' शब्दावरच घातली बंदी, मास्कही लावू शकत नाहीत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 03:30 PM2020-04-01T15:30:10+5:302020-04-01T15:30:39+5:30

जगभरात फक्त कोरोना व्हायरस हा विषय सुरू असताना एक असा देश आहे जिथे कोरोना व्हायरस या शब्दावर बंदी घालण्यात आली आहे.

Turkmenistan reportedly bans the word coronavirus and wearing of masks api | काय सांगता! 'या' देशात चक्क 'कोरोना व्हायरस' शब्दावरच घातली बंदी, मास्कही लावू शकत नाहीत लोक!

काय सांगता! 'या' देशात चक्क 'कोरोना व्हायरस' शब्दावरच घातली बंदी, मास्कही लावू शकत नाहीत लोक!

Next

जगभरात सध्या एकच विषय ट्रेंडिंग आहे तो म्हणजे कोरोना व्हायरस. गुगलवरही सर्वात जास्त सर्च केला जाणारा शब्द कोरोना व्हायरस आहे. इतकेच नाही तर फेसबुकवरही केवळ कोरोनासंबंधी पोस्ट दिसत आहेत. मात्र, तुर्कमेनिस्तान या देशाने कथितपणे 'कोरोना व्हायरस' या शब्दावर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर लोकांना मास्क घालण्यासही बंदी घातली आहे. 

independent.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कमेनिस्तानच्या सरकारच्या या आदेशानंतर स्थानिक मीडिया आणि आरोग्य मंत्रालयाद्वारे वाटण्यात आलेल्या हेल्थ इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्येही या शब्दाचा वापर टाळण्यात आला आहे. तसेच असेही सांगितले जात आहे की, या देशात महामारीशी संबंधित एकही केस नाही.

या देशात महामारीबाबत बोलणाऱ्या लोकांना येथील पोलीस डिटेन करत आहेत. Radio Azatlyk च्या रिपोर्टनुसार, सर्वसामान्य नागरिकांमध्ये काही स्पेशल एजन्ट्स सामान्य व्यक्तीच्या वेशात आहेत. ते लोकांचं बोलणं चोरून ऐकत आहेत. कुणी कोरोनाबाबत बोलतात का यावर लक्ष ठेवून आहेत.

असं असलं तरी आणि कोरोनाच्या केसेस नसल्याचं सांगितल्यावरही येथील सरकार या व्हायरसला रोखण्यासाठी काही कठोर पावले उचलत आहे. यात स्टेशनवर तापमानाची तपासणी करण्यापासून गर्दीच्या ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे. तसेच लोकांना खासकरून राजधानी बाहेर जाण्यास बंदी केली आहे.

रिपोर्टर विदाउट बॉर्डरच्या मुख्य Jeanne Cavelier म्हणाल्या की, कोरोना व्हायरससंबंधी कोणतीही बंदी तुर्कमेनिस्तानच्या नागरीकांचा जीव धोक्यात घालू शकते. तुर्कमेन अधिकाऱ्यांनुसार, तुर्कमेनिस्तानच्या नागरीकांकडे या महामारीबाबत कमी आणि एकतर्फी माहिती आहे. 

Web Title: Turkmenistan reportedly bans the word coronavirus and wearing of masks api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.