काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:08 IST2025-12-07T11:07:59+5:302025-12-07T11:08:36+5:30
या देशात पुरुषांची संख्या कमी होणे ठळकपणे दिसून येते. इतकेच नाही तर लातवियाई महिलांना पर्याय कमी असल्याने लग्नासाठी त्यांना इतर देशात जाण्यास भाग पाडले जाते.

काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
युरोपियन देश लातविया सध्या एका गंभीर लैंगिक समस्येचा सामना करत आहे. याठिकाणी महिलांना तासाच्या हिशोबाने पती भाड्याने घेण्याची वेळ आली आहे. तात्पुरत्या पतीच्या मदतीने या महिला घरातील छोटी मोठी कामे, घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करून घेत आहेत. त्याशिवाय स्वत:चा एकटेपणा घालवण्यासाठीही महिला या सेवेचा वापर करत असल्याचं समोर आले आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लातवियाई समाजात लैंगिक असमानतेमुळे ही गंभीर समस्या उद्भवली आहे. या देशात पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येच्या तुलनेत १५.५ टक्के कमी आहे. जे युरोपियन युनियनच्या लिंग गुणोत्तरापेक्षा तीन पट कमी आहे. लातवियात पुरुषांचे सरासरी वय महिलांपेक्षा कमी आहे. याठिकाणी ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेने दुप्पट आहे. या देशात पुरुषांची कमतरता दररोजच्या जीवनमानातही दिसून येत आहे. फेस्टिवल आयोजित करणाऱ्या दानिया नावाच्या महिलेकडे सर्व सहकारी कर्मचारी महिला आहेत. त्यांनी पुरुषांना भरती करण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही.
या देशात पुरुषांची संख्या कमी होणे ठळकपणे दिसून येते. इतकेच नाही तर लातवियाई महिलांना पर्याय कमी असल्याने लग्नासाठी त्यांना इतर देशात जाण्यास भाग पाडले जाते. देशात पुरुषांची संख्या कमी असल्याने असंख्य महिला एकट्याच राहत आहेत. त्यात आता देशात भाड्याने पती घेण्याची सुविधा सुरू झाली आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे पुरुषांना भाड्याने घेऊ शकता, त्यांच्याकडून प्लंबिंग, दुरुस्तीचे कामे यासारखी अवघड कामे करून घेता येतात. त्याशिवाय आणखी एक कंपनी तासाच्या हिशोबाने पती भाड्याने उपलब्ध करून देते. महिलाही या सुविधेचा वापर करत आहेत.
दरम्यान, लातवियामध्ये लैंगिक असमानतेचे मुख्य कारण म्हणजे पुरुषांचं कमी आयुष्यदर, जे उच्च धूम्रपान दर आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांमुळे आहे असं तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.