मच्छिमाराचं रातोरात बदललं नशीब, व्हेलच्या उलटीतून मिळणार 'इतके' कोटी रूपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 11:49 AM2020-12-14T11:49:52+5:302020-12-14T11:53:04+5:30

इथे एक मासेमारी करणारी व्यक्ती रातोरात कोट्यधीश झाली आहे. या व्यक्तीच्या हाती व्हेल माशाची उलटी लागली आहे ज्याने तो आता श्रीमंत झाला आहे.

Thailand beach whale vomit 25 crore | मच्छिमाराचं रातोरात बदललं नशीब, व्हेलच्या उलटीतून मिळणार 'इतके' कोटी रूपये...

मच्छिमाराचं रातोरात बदललं नशीब, व्हेलच्या उलटीतून मिळणार 'इतके' कोटी रूपये...

Next

एखाद्या व्यक्तीचं नशीब कसं चमकेल हे काही सांगता येत नाही. ज्या व्यक्तींचं नशीब असं अचानक चमकतं की, त्यांनी कधी विचारही केला नसेल. अशीच एक घटना थायलॅंडमधून समोर आली आहे. इथे एक मासेमारी करणारी व्यक्ती रातोरात कोट्यधीश झाली आहे. या व्यक्तीच्या हाती व्हेल माशाची उलटी लागली आहे ज्याने तो आता श्रीमंत झाला आहे.

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव नारिस आहे. त्याला आधी व्हेलची उलटी साधारण दगडाचा तुकडा वाटली होती. नंतर समजलं की, त्याची किंमत २४ लाख पाउंड(२५ कोटी रूपये) इतकी आहे. या उलटीची किंमत १०० किलो आहे. सोबतच असंही समोर आलं की, हा एम्बरग्रीसचा म्हणजेच व्हेलच्या उलटीचा आतापर्यंत आढळलेला सर्वात मोठा तुकडा आहे.

नारिस मासेमारी करून महिन्याला ५०० पाउंड म्हणजे ४८ हजार रूपयांच्या आसपास कमवतो. आधी तर त्याला ही उलटी दगडाचा तुकडा वाटली होती. याला एम्बरग्रीसही म्हटलं जातं. नारिसने सांगितले की, एका बिझनेसमनने जर या उलटीची क्वालिटी चांगली निघाली तर २३, ७४० पाउंड प्रति किलो किंमत देण्याचं आश्वासन दिलं आहे. 

एम्बरग्रीस व्हेलच्या आतड्यातून निघणारा स्लेटी किंवा काळ्या रंगाचा एक ठोस मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे. अनेकदा व्हेल ही उलटी तोंडातून काढते. हा पदार्थ व्हेलच्या शरीरा त्याच्या सुरक्षेसाठी तयार होतं. व्हेल समुद्र तटापासून फार दूर राहते, अशात तिच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ समुद्र किनाऱ्यावर यायला अनेक वर्ष महिने लागतात. 
 

Web Title: Thailand beach whale vomit 25 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.