Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 01:00 PM2021-07-30T13:00:45+5:302021-07-30T13:03:30+5:30

एलन मस्ककडून मालकाना उत्तरच नाही. ऑटो पायलट सिस्टमला अपडेट गरजेचं असल्याचं मालकानं व्यक्त केलं मत.

Tesla self driving car confuses moon for traffic light leaves netizens amused elon musk twitter | Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार

Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार

Next
ठळक मुद्देएलन मस्ककडून मालकाना उत्तरच नाही.ऑटो पायलट सिस्टमला अपडेट गरजेचं असल्याचं मालकानं व्यक्त केलं मत.

Tesla ची सेल्फ ड्राईव्ह कार अॅडव्हान्स्ड टेक्नॉलिजीचं उत्तम उदाहरण आहे. परंतु या टेक्नॉलॉजीमध्ये अद्यापही सुधारणांची आवश्यकता आहे. सध्या टेस्लाच्या सेल्फ ड्राईव्ह कारबाबक एक असा किस्सा घडला ज्यामुळे या कारच्या ऑटो पायलट सिस्टमला अपडेटची आवश्यकता असल्याचं मानलं जात आहे. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली, ज्यामध्ये आकाशात दिसणारा चंद्र टेस्लाची कार ट्रॅफिक लाईट समजून आपला स्पीड सतत कमी करत होती. 

जॉर्डन नेल्सन या कार चालकाला टेस्लाच्या ऑटो ड्राईव्ह कारचा अनोखा अनुभव आला. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कारनं एका ठिकाणी जात होते. यादरम्यान, त्यांनी पाहिलं की आपल्या कारचा स्पीड सातत्यानं कमी जास्त होत आहे. नेल्सन यांनी ही समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यावेळी त्याचं उत्तर मिळालं नाही. परंतु काही वेळानं त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.

 
आकाशातील चंद्राला ट्रॅफिक लाईट समजून त्यांची कार सतत आपला वेग कमी जास्त करत होती. ही अजब समस्या आलेल्या नेल्सन यांनी यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या ट्विटर अकाऊंटवरही तक्रार केली. तसंच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला. तुम्ही तुमच्या टीमला कारच्या ऑटोपायलट सिस्टमची तपासणी करण्यास सांगितलं पाहिजे, असंही त्यांनी यात लिहिलं होतं. याला लाखो व्ह्यूज मिळाले असून एलन मस्क यांच्याकडून मात्र कोणतंच उत्तर त्यांना मिळालं नाही.

Web Title: Tesla self driving car confuses moon for traffic light leaves netizens amused elon musk twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.