अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:47 PM2020-05-13T12:47:51+5:302020-05-13T12:52:39+5:30

निळा प्रकाश केवळ एका देशाच्या आकाशात नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, रशियासहीत इतरही देशात दिसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Strange blue lights appear in skies across the world as sightings flood internet api | अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल....

अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल....

Next

जगभरातील वेगवेगळ्या देशांतील आकाशात एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश आणि UFO सारख्या गोष्टी बघण्याच्या घटना पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. अमेरिकेतील टेक्सास आणि लास वेगासमधे गेल्या काही दिवसांपूर्वी एक विचित्र प्रकाश दिसून आाला. अशाच प्रकारचा वेगळा निळा प्रकाश इतरही काही देशांमध्ये दिसल्याची घटना समोर आली आहे.

हा निळा प्रकाश केवळ एका देशाच्या आकाशात नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, रशियासहीत इतरही देशात दिसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात सगळीकडे जवळपास एकसारखा निळा विचित्र प्रकाश दिसून येत आहे.

एक वेगळाच निळा प्रकाश आकाशात दिसण्याच्या घटना गेल्यावर्षीपासूनच सुरू झाला होता. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, सर्वातआधी अशाप्रकारचा प्रकाश मार्चच्या शेवटी स्पेनच्या मॅड्रिड शहरात बघायला मिळाला होता. हा प्रकाश एका सोसायटीच्या वर आकाशात दिसत होता आणि लोकांनी याचे व्हिडीओ व फोटो काढले. लोकांच्या माहितीनुसार साधारण 7 मिनिटे हा प्रकाश असाच दिसत होता.

त्यानंतर न्यूयॉर्कच्या क्वींसमधेही याचप्रकारचा प्रकाश बघायला मिळाला. 1 एप्रिलला क्वींसचं आकाशही निळं झालं. पण असं सांगण्यात आलं आहे की, एका पॉवर हाऊसला आग लागल्यावरही रात्री अशाप्रकारचा निळा प्रकाश आकाशात दिसू शकतो. पण प्रश्न हा आहे वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखी घटना कशी घडू शकते.

न्यूयॉर्कमधेही हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि लोकांना हा सगळा प्रकार विचित्र वाटला. अमेरिकेतीलच पेंसल्वेनियामध्ये अशाप्रकारचा प्रकाश दिसल्याची घटना समोर आली होती. येथील फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

14 एप्रिलला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या आकाशात सुद्धा याप्रकारचा निळा प्रकाश बघायला मिळाला. अमेरिकत आणि स्पेनमध्ये जसा प्रकाश बघायला मिळाला. तसाच हा आहे. 

हे फोटो व्हायरल झाले असून लोकांनी याला सरकारची एखादी गुप्त टेस्ट असल्याचं मत व्यक्त केलंय. पण काही लोकांना वेगवेगळ्या शंका या प्रकाशाबाबत वाटत आहे. पण स्पष्टपणे या प्रकाशाचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. अनेकजण याला UFO किंवा एलियनसोबत जोडून बघत आहेत.

Web Title: Strange blue lights appear in skies across the world as sightings flood internet api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.