बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:23 PM2019-10-12T16:23:59+5:302019-10-12T16:29:21+5:30

काही वर्षांपूर्वी एटीएम कार्ड फार उत्सुकतेचा विषय होते. पण आता एका व्यक्तीकडे तीन ते चार एटीएम सहजपणे असतात.

This is solid gold 18 carat debit card royal mint invest made this | बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्... 

बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्... 

googlenewsNext

काही वर्षांपूर्वी एटीएम कार्ड फार उत्सुकतेचा विषय होते. पण आता एका व्यक्तीकडे तीन ते चार एटीएम सहजपणे असतात. पूर्वी एटीएमवर नाव नसायची आता नावं पण देतात. अशातच एका अनोख्या एटीएमची चर्चा होऊ लागली आहे. 'द रॉयल मिंट'ने जगातलं पहिलं असं एटीएम तयार केलंय जे पूर्णपणे सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे.

१८ कॅरेट सोन्याचं एटीएम

हे एटीएम कार्ड १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे. यावर कार्डधारक व्यक्तीचं नावही असणार आहे.  इतकेच काय तर या कार्डवर कोणतेही ट्रान्झॅक्शन चार्जेसही लागणार नाहीयेत. तसेच फॉरेन एक्सचेंज फी सुद्धा द्यावी लागणार नाहीये.

हे सोन्याचं एटीएम कार्ड १८,७५० यूरोचं आहे. भारतीय करन्सीनुसार हे सोन्याचं एटीएम कार्ड १४,७०,०६३.५८ रूपयांचं आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी एक खासप्रकारचं अकाऊंट उघडावं लागेल. याचं नाव आहे Raris. हे सोन्याचं अकाऊंट एकप्रकारचं डेबिट कार्ड आहे. पण याला लग्जरी पेमेंट कार्डच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Simon Bradley जे 'द रॉयल मिंट' चे पार्टनरशिप हेड आहेत. ते म्हणाले की, 'हे कार्ड तयार करून आम्ही खूप आनंदी आहोत'. हे कार्ड अजून लॉन्च झालेलं नाही, पण लवकरच यूकेतील बाजारात दाखल होणार आहे.


Web Title: This is solid gold 18 carat debit card royal mint invest made this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.