धक्कादायक! 'ती' मदतीसाठी ओरडत राहिली पण कुणी आलं नाही, उभ्यानेच बाळाला दिला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:09 PM2020-04-13T13:09:36+5:302020-04-13T13:14:22+5:30

ती वेदनेने विव्हळत होती, पण तिला कुणीच मदत केली नाही आणि तिने उभ्यानेच बाळाला जन्म दिला.

Shocking! Woman detained near US-Mexico border forced to deliver baby standing api | धक्कादायक! 'ती' मदतीसाठी ओरडत राहिली पण कुणी आलं नाही, उभ्यानेच बाळाला दिला जन्म!

धक्कादायक! 'ती' मदतीसाठी ओरडत राहिली पण कुणी आलं नाही, उभ्यानेच बाळाला दिला जन्म!

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या थैमानादरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातीलच एक संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इंडिया टाइम्स वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेला मेक्सिको-यूएस बॉर्डरवर ताब्यात घेण्यात आलं होतं. ती गर्भवती होती. तिला अचानक वेदना सुरू झाल्या. अनेकांकडे तिने मदत मागितली, पण तिची वेळीच कुणीच केली नाही. अशात तिला उभ्याने बाळाला जन्म द्यावा लागला.

अमेरिकन सिव्हील लिबर्टिज यूनियननुसार, या महिलेचं वय 27 वर्षे आहे. तिने Chula Vista Border Patrol सॅन डिएगोत तिने एका एजन्टला सांगितले की, तिला वेदना होत आहेत. पण त्याने याकडे दुर्लक्ष केलं. तिला वेदना इतक्या तीव्र होत होत्या की, तिने बाजूला असलेल्या कचऱ्याच्या डब्याला पकडलं. या महिलेने पॅंट घातली होती. अशाच स्थितीत तिने बाळाला जन्म दिला.

पतीने महिलेच्या आवाजातच नवजात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला. त्यांने महिलेची पॅंट जरा खाली करून पाहिली तर बाळाचं डोकं जरा बाहेर आलं होतं. यावेळी त्याच्याजवळ आधीच दोन मुले होती. ते सुद्धा वेदनेने किंचाळत असलेल्या आपल्या आईकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते.

महिला वेदनेने ओरडत राहिली, पण तिच्या मदतीसाठी तेथील कुणीच आलं नाही. तिने पॅंटमधेच बाळाला जन्म दिला. ACLU च्या अटार्नी Monika Y Langarica यांनी सांगितले की, 'एजन्सीकडून अशाप्रकारची वागणूक मिळणं हे फारच भयावह होतं'.

महिलेने बाळाला जन्म दिल्यावर तिला आणि तिच्या परिवाराला मेक्सिकोला परत पाठवण्यात आलं. चीफ पेट्रोल एजन्ट एरेन यांनी सांगितले की, नंतर महिलेला मेडिकल मदत करण्यात आली. ती आणि तिचं बाळ दोघेही ठिक आहेत.

Web Title: Shocking! Woman detained near US-Mexico border forced to deliver baby standing api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.