अंतराळात हॉटेल असेल का? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. तर याचं उत्तर हो असं देता येईल. इतकंच नाही तर अंतराळातील या हॉटेलचे काही फोटोही समोर आले आहेत. या अद्भूत हॉटेलचं डिझाइन 'गेटवे फाउंडेशन' ने तयार केलं आहे. ज्यात आरामात ४०० लोक राहू शकतील. कोणत्याही शानदार हॉटेलसारख्या यातही रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह या गोष्टी असतील. जगातल्या पहिल्या अंतराळ हॉटेलचं नाव Von Braun Space Station असं असेल. रिपोर्टुनुसार, हॉटेलच्या आत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या टेक्निकचाच वापर केला जाईल.

'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन' च्या उलट या हॉटेलमध्ये आर्टिफिशिअल गुरूत्वाकर्षण शक्तीचा वापर केला जाईल. जेणेकरून लोक या हॉटेलमध्ये सहजपणे इकडे-तिकडे फिरू शकतील.

या हॉटेलचा आकार १९० मीटर डायमीटरच्या चाकासारखा असेल. हे गोल फिरत राहील. जेणेकरून गुरूत्वाकर्षण बल तयार व्हावं.
गेटवे फाउंडेशननुसार, हे हॉटेल २०२५ पर्यंत तयार होईल.

असा अंदाज लावला जात आहे की, यात दर आठवड्याला जवळपास १०० प्रवाशी थांबू शकतील.

एकदा जेव्हा 'गेटवे फाउंडेशन'चं हॉटेल सुरू होईल, त्यानंतर या हॉटेलपेक्षाही मोठं हॉटेल लॉन्चिंग करण्याचा प्लॅन केला जात आहे. ज्यात १४०० लोक थांबू शकतील.


Web Title: See pics worlds first space hotel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.