मोटरमननं पाहिलं रेल्वे रुळावर झोपला होता युवक; ट्रेन थांबवणं शक्य नव्हतं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:41 PM2022-01-19T12:41:57+5:302022-01-19T12:43:27+5:30

ज्याठिकाणी ही घटना घडली तो जगातील सर्वात थंड परिसर आहे.

Russian Man Slept on railway track, train runs over him | मोटरमननं पाहिलं रेल्वे रुळावर झोपला होता युवक; ट्रेन थांबवणं शक्य नव्हतं, मग...

मोटरमननं पाहिलं रेल्वे रुळावर झोपला होता युवक; ट्रेन थांबवणं शक्य नव्हतं, मग...

Next

नवी दिल्ली – ट्रेनच्या पटरीवरुन चालणं, बाजूला उभं राहणं हे जीवासाठी धोकादायक असतं. रेल्वे अपघातात अनेक लोकांचे जीव जातात. वेगवाने ट्रेनच्या धडकेने कुणीच वाचू शकत नाही. अशात एक व्यक्ती -१८ से. तापमानात कडाक्याच्या थंडीत सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर दारुच्या नशेत झोपला होता. त्याचवेळी या रुळावरुन ट्रेन जात होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून हा व्यक्ती रेल्वेच्या अपघातातून बचावला.

मिरर युकेच्या रिपोर्टनुसार, रशियातील Kransnoyarsk शहरातील ही घटना आहे. ज्याठिकाणी ३६ वर्षीय व्यक्ती रेल्वे अधिकाऱ्यांना पटरीच्या दरम्यान झोपलेल्या अवस्थेत आढळला. या रुळावरुन जाणाऱ्या ट्रेनच्या चालकाने त्या व्यक्तीला पाहिलं. परंतु अचानक ट्रेन रोखणं शक्य नव्हतं. त्यानंतर काही अंतरावर जात ट्रेन थांबवली तेव्हा त्या युवकाला पाहण्यासाठी लोकं धावली. हा युवक ट्रेनच्या पटरीवर पडला होता तेव्हा त्याचा मृत्यू झाला असावा असं लोकांना वाटलं. परंतु त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

हा युवक सुखरुप असल्याचं लोकांनी पाहिलं. रशिया गृह मंत्रालयाने एक व्हिडीओ जारी करत त्या व्यक्तीला ट्रेनच्या पटरीवरुन जिवंत बाहेर काढल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे ज्याठिकाणी ही घटना घडली तो जगातील सर्वात थंड परिसर आहे. तो व्यक्ती सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर पडला होता. संपूर्ण ट्रेन त्याच्या अंगावरुन गेली त्यानंतर लोकांनी त्या व्यक्तीवर चादर टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यावेळी तापमान मायनस १८ डिग्री से.हून कमी होतं.

रिपोर्टनुसार, हा व्यक्ती रेल्वे स्टेशनवर त्याच्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने दारु प्यायली आणि त्याला नशा चढली. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत तो रेल्वे ट्रॅकवरच झोपला. Krol आणि Dzhetka या रेल्वे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. ट्रेनच्या पटरीमध्ये झोपल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले. ट्रेन अंगावरुन गेल्याने या व्यक्तीला काही जखमा झाल्या होत्या. परंतु त्या जखमा गंभीर नव्हत्या. हा व्यक्ती सध्या सुखरुप आहे.  

Web Title: Russian Man Slept on railway track, train runs over him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.