अरे बापरे ! १५०० किलो वजनाच्या वाघाचा सापडला सांगाडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:48 PM2019-04-23T13:48:01+5:302019-04-23T14:02:56+5:30

गवताच्या मैदानात २.३ कोटी वर्षांपूर्वी वाघांची एक विशाल प्रजाती राहत होती. याचं वजन साधारण १५०० किलो ग्रॅम होतं.

Researchers discover ancient giant lion in Kenya South Africa | अरे बापरे ! १५०० किलो वजनाच्या वाघाचा सापडला सांगाडा!

अरे बापरे ! १५०० किलो वजनाच्या वाघाचा सापडला सांगाडा!

(Image Credit : PressFrom)

केनियामध्ये एका वाघाचे जीवाश्म मिळाले आहेत. याला संशोधक वाघाची सुरुवातीची प्रजाती असल्याचे सांगत आहेत. त्यांचं मत आहे की, आफ्रिकेमध्ये सावानाच्या गवताच्या मैदानात २.३ कोटी वर्षांपूर्वी वाघांची एक विशाल प्रजाती राहत होती. याचं वजन साधारण १५०० किलो ग्रॅम होतं. वाघांची ही प्रजाती हत्ती एवढ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करत होते. ड्यूक आणि ओहायो यूनिव्हर्सिटीचे संशोधक मॅथ्यू बोर्थ्स आणि नॅन्सी स्टीवन्स यांनी वाघाच्या सांगाड्याची टेस्ट केल्यानंतर ही माहिती दिली.

काय आहे या प्रजातीचं नाव?

रिपोर्ट्सनुसार, २.३ कोटी वर्ष जुन्या या जीवाला 'सिम्बाकुबवा कुतोक आफ्रिका' नाव दिलं गेलं आहे. कारण स्वाहिली भाषेत विशाल आफ्रिकी वाघांना 'सिम्बाकुबवा' म्हटलं जातं. 

पोलर बिअरपेक्षा मोठे प्राणी

संशोधक मॅथ्यू म्हणाले की, 'आम्हाला मिळालेल्या या प्राण्याच्या दातांवरुन आम्ही हे म्हणू शकतो की, सिम्बाकुबला खास आणि विशाल मांसाहारी जीव होते. हे वाघ आजच्या वाघांपेक्षा आकाराने मोठे होते. कदाचित पोलर बिअरपेक्षाही मोठे होते'.

संशोधकांना १० वर्षांपूर्वी केनियाच्या मेस्वा पुलाजवळ सिम्बाकुबवाची हाडे मिळाली होती. पण फार वर्ष संशोधकांना याची माहिती मिळाली नाही की, ही हाडे कोणत्या प्राण्याची असू शकतात. त्यांनी ही कल्पना सुद्धा केली होती की, ही हाडे विशाल वाघाची असतील.

रिपोर्टनुसार, पृथ्वीवर वाघांची ही प्रजाती मायोसिन काळात होती. मायोसिन तो काळ होता जेव्हा वानर पृथ्वीवर चालणं शिकू लागले होते. पण सिम्बाकुबवा हे एक कोटी वर्षांपूर्वी पूर्णपणे लुप्त झाले होते. 

Web Title: Researchers discover ancient giant lion in Kenya South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.