अरे व्वा! एअरोपेनिक टेक्निकने जमीन, मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे; उत्पन्नही १० टक्क्यांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 08:01 PM2021-01-19T20:01:37+5:302021-01-19T20:10:32+5:30

Trending Viral News in Marathi : आता शेतकरी माती आणि जमीनीशिवाय बटाटे पिकवू शकतात.  याशिवाय १० टक्के उत्पादन वाढल्यानं नफा सुद्धा जास्त होईल.  

Potato yeld soil less aeroponic karnal haryana | अरे व्वा! एअरोपेनिक टेक्निकने जमीन, मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे; उत्पन्नही १० टक्क्यांनी वाढणार

अरे व्वा! एअरोपेनिक टेक्निकने जमीन, मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे; उत्पन्नही १० टक्क्यांनी वाढणार

googlenewsNext

(Image Credit- Aajtak)

बटाटे हवेत उगवता येऊ शकतात? होय, कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या एअरोपेनिक पद्धतीने तुम्ही जमीन आणि मातीशिवाय हवेत चांगल्या गुणवत्तेचे बटाटे पिकवू शकता. हरियाणातील  करनाळ जिल्ह्यातील बटाटा प्राद्योगिक केंद्रात ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या नवीन तंत्रानं १० टक्के जास्त उत्पन्न घेतलं जाऊ शकतं. आता शेतकरी माती आणि जमीनीशिवाय बटाटे पिकवू शकतात.  याशिवाय १० टक्के उत्पादन वाढल्यानं नफा सुद्धा जास्त होईल.  

पारंपारिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी या एअरोपेनिक टेक्निकचा वापर केला तर बटाट्याच्या शेतीत जास्त उत्पन्न मिळवता  येऊ शकतं.  केंद्र सरकारकडून या बटाट्यांच्या शेतीसाठी नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बटाटा प्राद्योगिक केंद्र आणि  इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर यांचा एक करार झाला आहे.

 एरोपोनिक तकनीक से हवा में उगेंगे आलू (फोटो आजतक)

आता भारतातही सरकारकडून एअरोपोनिक प्रकल्पाला परवानगी मिळाली आहे. डॉ. मुनीश सिंगल सिनीयर कंसलटेंट यांनी सांगितले की, ''एअरोपेनिक एक आधुनिक  पद्धती आहे. या टेक्निकचा वापर करून हवेत बटाट्यांचे उत्पन्न घेता येऊ शकते. या पीकाला आवश्यक असलेले घटक मातीतून नाही तर हवेत लटकत असलेल्या मुळांपासून दिले जातात. हिवाळ्यात आजारांना ४ हात लांब ठेवण्यासाठी फायदेशीर गाजराचा हलवा; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

या पद्धतीने बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येऊ शकते. यामुळे मृदाजन्य रोगांपासून सुटका मिळवता येऊ शकते. येत्या काळात या पद्धतीने गुणवत्ता पूर्ण बियाणांची कमतरता पूर्ण  करता येऊ शकते. बटाटा प्राद्योगिक केंद्रातील तज्ज्ञ  शार्दुल शंकर यांनी सांगितले की, ''२ कोटींच्या निधीने केंद्रात एक सिस्टीम इन्स्टॉल करण्यात येणार आहे. ज्याद्वारे बटाट्याच्या बियाणांची क्षमता वाढवता येऊ शकते.''  मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

Web Title: Potato yeld soil less aeroponic karnal haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.