बाबो! पोटात दुखत होतं म्हणून दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी एक्स-रे पाहिला तर मूत्राशयात होता चार्जरचा केबल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:50 AM2020-06-06T11:50:49+5:302020-06-06T12:00:33+5:30

डॉक्टर Wallie Islam यांनी याबाबत त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी ऑपरेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

OMG! Assam man complained of stomach ache had charger cable in his bladder | बाबो! पोटात दुखत होतं म्हणून दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी एक्स-रे पाहिला तर मूत्राशयात होता चार्जरचा केबल!

बाबो! पोटात दुखत होतं म्हणून दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी एक्स-रे पाहिला तर मूत्राशयात होता चार्जरचा केबल!

Next

अनेक विचित्र घटना गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळाल्या असतील. पण आज जी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तशी नक्कीच तुम्ही ऐकली नसेल. ही घटना आहे आसाममधील. एक व्यक्ती काही दिवसांपूर्वीच पोटात दुखत असल्याने डॉक्टरकडे गेली होती.

त्याने डॉक्टरला सांगितले की, पोटात दुखत आहे. त्याने डॉक्टरांना हेही सांगितले की, त्याने चुकून त्याच्या फोन चार्जरची वायर गिळलीये. पुढे डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जे घडलं ते आणखीनच आश्चर्यकारक आहे.

डॉक्टर Wallie Islam यांनी याबाबत त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी ऑपरेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा आम्ही त्या व्यक्तीचं ऑपरेशन केलं तेव्हा त्याच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये काहीच आढळून आलं नाही'.

डॉक्टर हैराण तेव्हा झाले जेव्हा त्यांनी एक्स-रे काढला. यात दिसून आलं की, हेडफोनची केबल व्यक्तीच्या पोटात नाही तर त्याच्या मूत्राशयात होती. डॉक्टरांनी सांगितले की, 'मी गेल्या 25 वर्षांपासून सर्जरी करत आहे. पण अशी केस पहिल्यांदाच पाहिली'.

डॉक्टरांनी लिहिले की, या व्यक्तीने चार्जरची केबल तोडांवाटे नाही तर लिंगावाटे आत टाकली होती. त्याची सर्जरी यशस्वी झाली. केबल काढण्यात आली. पण डॉक्टर म्हणाले की, त्याच्या मानसिक स्थितीवर अजूनही प्रश्न आहे. 

Web Title: OMG! Assam man complained of stomach ache had charger cable in his bladder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.