Motorcyclist in florida died after lightning strikes his helmet | हायवेवर चालवत होता बाईक, Helmet वर पडली वीज आणि जागीच मृत्यू
हायवेवर चालवत होता बाईक, Helmet वर पडली वीज आणि जागीच मृत्यू

नुकतीच पावसाला सुरूवात झाली आहे. विजांचा कडकडाट आणि पावसाची संततधार मनाला दिलासा देणारी ठरत आहे. मात्र या विजांमुळे अनेक धक्कादायक घटनाही घडतात. अशीच एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडली. एका व्यक्ती हायवेवर बाईक चालवत होता. अचानक त्याच्या हेल्मेटवर वीज पडली. यात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

हा फोटो ट्विटरवर फ्लोरिडा हायवे पेट्रोलने शेअर केला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, 'अचानक ४५ वर्षीय व्यक्तीच्या हेल्मेटवर वीज पडली. तो बाईक चालवत होता. साऊथबाउंड I-95 Volusia County ची घटना आहे. तो वाचू शकला नाही'.


वर्षभरात ५० पेक्षा अधिक लोकांचा होतो मृत्यू

अमेरिकेतील National Weather Services नुसार, ५० पेक्षा अधिक लोकांचा वीज पडून मृत्यू होता. आता मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख पोलिसांनी अजून जाहीर केली नाही. 


Web Title: Motorcyclist in florida died after lightning strikes his helmet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.