Gay मुलाच्या आनंदासाठी आईचं मोठं पाऊल, आजीने दिला नातीला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:48 PM2019-04-04T12:48:48+5:302019-04-04T12:54:43+5:30

अमेरिकेतील नेब्रास्कनची ही घटना आहे. इथे एका गे व्यक्तीला बाळ दत्तक घ्यायचं होतं.

This mother became a surrogate for her gay son in America | Gay मुलाच्या आनंदासाठी आईचं मोठं पाऊल, आजीने दिला नातीला जन्म!

Gay मुलाच्या आनंदासाठी आईचं मोठं पाऊल, आजीने दिला नातीला जन्म!

अमेरिकेतील नेब्रास्कनची ही घटना आहे. इथे एका गे व्यक्तीला बाळ दत्तक घ्यायचं होतं. यासाठी त्याच्या आईनेच त्याला मदत केली. सरोगसीच्या माध्यमातून त्याच्या आईनेच त्याचा बाळाला जन्म दिला. ऐकायला थोडं विचित्र आहे. पण सरोगेट आई होणारी महिला सेसिल एलेजने स्वत: तिच्या नातीला जन्म दिला आहे. 

सेसिल यांचा मुलगा मॅथ्यू एलेज त्याचा पार्टनर एलिअट डॉगर्टीसोबत राहतो. दोघेही बाळासाठी प्लॅनिंग करत होते. सेसिलने सरोगेट आई होण्याची इच्छा व्यक्त केली. सेसिल या ६१ वर्षांच्या आहेत.

त्यांनी सांगितले की, पहिल्यांदा जेव्हा त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सरोगेट आई होण्याच्या निर्णयाबाबत सांगितले तेव्हा त्यांची खिल्ली उडवली गेली. काही दिवस लोक याला एक गंमत समजत होते. पण नंतर सरोगेट आई होण्यासाठी डॉक्टरांनीही सेसिल यांनी होकार दिला. मॅथ्यूने त्याचे स्पर्म दिले तर त्याच्या पार्टनरच्या बहिणीने एग डोनेट केले. 

सोशल मीडियात सध्या या घटनेचं कौतुक केलं जात आहे. तर अनेकांनी ही पोस्ट रिशेअर केली आहे. दोघांचेही परिवारही आनंदी आहेत. 

Web Title: This mother became a surrogate for her gay son in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.