जगातील सर्वात महागडा आंबा भारतात आढळतो 'या' ठिकाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:56 PM2022-05-20T16:56:37+5:302022-05-20T17:00:02+5:30

दशहरी, चौसा आणि लंगडा आंब्याची नावे तुम्ही सर्वांनी ऐकली असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच आंब्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या किमतीमुळे तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. आपण ज्या आंब्याबद्दल बोलत आहोत तो जपानमध्ये आढळतो. याशिवाय हा आंबा भारतातही आढळतो.

most expensive mango in the world | जगातील सर्वात महागडा आंबा भारतात आढळतो 'या' ठिकाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

जगातील सर्वात महागडा आंबा भारतात आढळतो 'या' ठिकाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

googlenewsNext

जगात फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्याच्या अनेक जाती आहेत. याशिवाय आंब्याला राज्य फळाचा दर्जा आहे. जगातील विविध देशांतील आंब्यांचीही स्वतःची खासियत आहे. दशहरी, चौसा आणि लंगडा आंब्याची नावे तुम्ही सर्वांनी ऐकली असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच आंब्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या किमतीमुळे तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. आपण ज्या आंब्याबद्दल बोलत आहोत तो जपानमध्ये आढळतो. याशिवाय हा आंबा भारतातही आढळतो.

जपान आणि बिहारमध्ये मिळणाऱ्या जगातील सर्वात महागड्या आंब्याचे नाव आहे तैयो नो तामांगो. तो जपानच्या मियाझाकी प्रांतात आढळतो, तर बिहारमधील पूनिया आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथेही आढळतो. सामान्य माणूस हा आंबा विकत घेण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. जाणून घेऊया या खास आंब्याविषयी…

हा आंबा सामान्यतः जपानमधील मियाझाकी, क्युशू प्रांतांत पिकवला जातो. त्यातच भारतामधील मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येही याची काही झाडे आहेत आणि एक झाड बिहारमधील पूर्णियामध्ये देखील आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत २.७ लाख रुपये प्रति किलो आहे. तैयो नो तामांगो जातीच्या आंब्याची भारतातील किंमत २१ हजार आहे. पूर्णियामध्ये या जातीचे एक झाड आहे, जे २५ वर्षांपासून अस्तित्वात आहे. हा आंबा खाताना गोडवा व्यतिरिक्त, नारळ आणि अननसाची चव देखील आपल्याला लागते.

हा आंबा एका खास पद्धतीने तयार केला जातो. आंब्याच्या झाडाला फळे लागल्यानंतर प्रत्येक फळ जाळीच्या कापडात बांधले जाते. यामुळे आंब्याचा रंग वेगळा असतो. जांभळ्या रंगाचा हा आंबा दिसायलाही खूप सुंदर दिसतो.

Web Title: most expensive mango in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.