बाबो! 'या' बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, किंमत वाचून व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 12:02 PM2020-07-31T12:02:43+5:302020-07-31T12:18:14+5:30

हा बकरा १८ महिन्यांचा असून ९० किलो याचं वजन आहे. त्याला हिरव्या गवतासोबत चना डाळ, गहूं आणि शेंगदाणे दिवसातून तीनदा खाऊ घातले. त्याची काळजी घेतली.

Most expensive goat costs Rs.1.5 lakh in sangli | बाबो! 'या' बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, किंमत वाचून व्हाल हैराण...

बाबो! 'या' बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, किंमत वाचून व्हाल हैराण...

googlenewsNext

देशात बकरी ईदचा उत्साह आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातून एक बकऱ्याची चर्चा चांगली रंगली आहे. याला कारण ठरलीये या बकऱ्याची खासियत आणि त्यामुळे वाढलेली त्याची किंमत. या बकऱ्याच्या एका खासियतमुळे याची किंमत दीड लाख रूपये लावण्यात आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हा बकरा सांगली जिल्ह्यातील पेड गावातील आहे. येथील सुरेश शेंडगे नावाच्या व्यक्तीने हा बकरा पाळला आहे. या बकऱ्याची खासियत ही आहे की, याच्या कपळावार एक चंद्राच्या कोरीची आकृती आहे. ज्यामुळे या बकऱ्याची किंमत दीड लाख लावण्यात आली आहे.

अशी मान्यता आहे की, बकरी ईदला ज्या बकऱ्याचा बळी दिला जातो. त्या बकऱ्यावर जर कुठेही चंद्रासारखी खूण असेल तर शुभ मानलं जातं. सोबतच चंद्राची आकृती  बकऱ्यावर असेल तर अल्लाह बळी कबूल करतो अशीही मान्यता आहे. या मान्यतेमुळेच अशा बकऱ्यांची किंमत इतर बकऱ्यांपेक्षा अधिक असते.

याच मान्यतेच्या आधारावर बकऱ्याचे मालक सुरेश शेंडगे म्हणाले की, या बकऱ्यासाठी आतापर्यंत दीड लाख रूपये किंमत देण्यासाठी लोक तयार झाले आहे. त्यांचं मत आहे की, त्यांनी या बकऱ्याला फार लाडाने वाढवलं आहे. हा बकरा १८ महिन्यांचा असून ९० किलो याचं वजन आहे. त्याला हिरव्या गवतासोबत चना डाळ, गहूं आणि शेंगदाणे दिवसातून तीनदा खाऊ घातले. त्याची काळजी घेतली. सध्या ते आणखी चांगल्या किंमतीची वाट बघत आहेत.

हे पण वाचा :

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

Web Title: Most expensive goat costs Rs.1.5 lakh in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.