म्हणून एका रात्रीत झाला होता लाखो लोकांचा मृत्यू....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:23 PM2020-03-31T16:23:47+5:302020-03-31T16:29:52+5:30

ही घटना जपानची राजधानी टोकियोमध्ये घडली होती.

Most destructive bombing raid in history bombing of tokyo also known as great tokyo air raid operation meeting house MYB | म्हणून एका रात्रीत झाला होता लाखो लोकांचा मृत्यू....

म्हणून एका रात्रीत झाला होता लाखो लोकांचा मृत्यू....

Next

विज्ञानांतील शोधांमुळे माणसाला जेवढा फायदा मिळतो. तेवढंच नुकसानाचा सुद्धा सामना करावा लागतो. एकेकाळी जेव्हा जपानच्या हिरेशिमा आणि नागासाकीवर अणूबॉम्ब फेकण्यात आला होता. त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सगळ्यात घातक बॉम्ब  हे एक-एक करून टाकले होते. आज आम्ही तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त महाभयंकर असलेल्या एका बॉम्बस्फोटाबद्दल  सांगणार आहोत. यामुळे संपूर्ण शहरात एकावेळी बॉम्ब फोडण्यात आले होते तसंच एका रात्रीत एक लाख लोकांचा मृत्यू झाला. 

या विनाशकारी बॉम्फस्फोटाच्या घटनेला बॉम्बिंग ऑफ टोक्यो किंवा ग्रेट टोक्यो एयर रेड या नावाने ओळखलं जातं. ही घटना जपानची राजधानी टोक्योमध्ये घडली होती.  ही घटना हिरेशिमा आणि नागासाकीच्या चार महिने आधी घडली होती.  पण या घटनेत भयानक आणि विनाशकारी घटनेला अमेरिकेने हल्ल्यातून उत्तर दिलं होतं. 

दुसरं महायुध्द चालू होतं तेव्हा अमेरिकेने एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं. त्याचं नाव 'ऑपरेशन मीटिंगहाउस असं होतं. यावेळी  अमेरिकेने आपले 279 बोइंग बी -29 विमानाला टोक्योवर बॉम्ब फेकण्यासाठी पाठवलं होतं.  मार्च १९४५ च्या रात्री हे मिशन सुरू झालें.  त्यानंतर अमेरिकन विमानांनी संपूर्ण टोक्यो शहरावर बॉम्ब टाकायला सुरूवात  केली. 

१० मार्च १९४५ ला सकाळी ऑपरेशन मिटिंगहाऊस पूर्ण संपलं. पण एका दिवसात अमेरिकेतील विमानांनी इतके बॉम्ब टाकले की त्यामुळे जवळपास एक लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. दीड लाखांपेक्षा जास्त लोक जखमी झाले. तसंच १० लाख लोक बेघर झाली. या घटनेत अमेरिकेतील विमान सुद्धा समाविष्ट होते. त्यात अमेरिकेचे ९६ सैनिक मारले गेले.  एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील विमानांनी टोक्याोवर जवळपास १६६५ टन बॉम्ब टाकले होते. या बॉम्बस्फोटात जवळपास ८६ हजारांपेक्षा जास्त इमारती संपूर्णपणे नष्ट झाल्या. हा जगातला सगळ्यात महाभयंकर हवाई हल्ला समजला जातो.

Web Title: Most destructive bombing raid in history bombing of tokyo also known as great tokyo air raid operation meeting house MYB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.