बाबो! या गावात एकटीच कशी राहते ही बाई आणि का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 05:48 PM2020-03-29T17:48:27+5:302020-03-29T17:50:53+5:30

या गावात फक्त एक महिला राहते. ती सुद्धा वयस्कर आहे. या महिलेची गोष्ट ऐकून तुम्ही नक्की हैराण व्हाल. 

In Monowi village where women staying alone in America myb | बाबो! या गावात एकटीच कशी राहते ही बाई आणि का?

बाबो! या गावात एकटीच कशी राहते ही बाई आणि का?

Next

(image credit- pinterest)

गाव कोणतंही असू दे कितीही लहान असेल तरी १०० ते २०० लोक या गावात असातात.  तुमचा विश्वास बसणार नाही पण एका गावाची लोकसंख्या फक्त एक आहे. या गावात फक्त एक महिला राहते. ती सुद्धा वयस्कर आहे. या महिलेची गोष्ट ऐकून तुम्ही नक्की हैराण व्हाल. 

या गावाचं नाव मोनोवी असं आहे.  जे गाव अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये आहे. २०१० च्या जनगणनेनुसार या ठिकाणी फक्त एक वयस्कर महिला  राहते. या महिलेचं वय ८६ वर्ष आहे. या ठिकाणांची काळजी घेणारी तसंच लायब्ररी पाहणारी ही एकमेव बाई आहे. या वृध्द स्त्रीचं नाव एल्सी आयलर आहे.  

हे गाव जवळपास ५४ एकरात पसरलेलं आहे. सुरूवातीला या गावात १२३ लोक राहत होते. त्यानंतर लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली. १९८० मध्ये या गावात फक्त १८ लोक राहत होते. त्यानंतर  साल २००० येईपर्यंत या ठिकाणी फक्त दोन लोक  राहत होते.  एस्ली आईलर आणि त्यांचा पती रुडी आईलर,  २००४ मध्ये रुडी आईलर यांचा मृत्यू झाला.  त्यानंतर या एकट्याचं राहू लागल्या. 

८६ वर्षीय एल्सी हे संपूर्ण गाव एकटं चालवतात. या ठिकाणी अमेरिका आणि  इतर देशांचे सुद्धा लोक येतात. उन्हाळ्यात अनेक लोक या गावी येऊन राहतात. एल्सी यांनी आपल्या मदतीसाठी कोणालाही जवळ ठेवलेले नाही. या गावात एक पोस्ट ऑफिस सुद्धा होतं.  दिवसेंदिवस कमी होत  जाणारी लोकसंख्या लक्षात घेता  हे पोस्ट ऑफिस बंद करण्यात आलं.  असं म्हणतात की या गावातील लोक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी गाव सोडून गेले आहेत. 

Web Title: In Monowi village where women staying alone in America myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.