Monkey loot four lakh from elderly man and started throwing currency | VIDEO : माकड चार लाख रूपये असलेली बॅग घेऊन पळालं अन् झाडावरून पैशांचा पाऊस पाडू लागलं.....

VIDEO : माकड चार लाख रूपये असलेली बॅग घेऊन पळालं अन् झाडावरून पैशांचा पाऊस पाडू लागलं.....

माकडांची मस्ती कशी असते हे कधी ना कधी तुम्ही एकतर प्रत्यक्षात पाहिलेलं असतं नाही तर टीव्हीवर तरी पाहिलेलं असतं. अनेकदा तर ते घरावर सुकायला ठेवलेले कपडेही घेऊन जातात तर कधी चपला घेऊन जातात. माकडाचा असाच एक कारनामा समोर आला आहे. माकडाने लाखो रूपये असलेली पिशवी चोरी केली आणि नंतर झाडावर चढून पिशवीतील नोटा फेकू लागला होता. 

ही घटना यूपीतील सीतापूरची आहे.  इथे एक वयोवृद्ध काही कामानिमित्त आले होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग घेऊन माकड पळालं. तो एका झाडावर चढला. त्यानंतर बॅगेतील नोटा काढून खाली फेकू लागला होता.

आता ५००-५००च्या नोटांचा पाऊस पाहून आजूबाजूला  सगळा गोंधळच उडाला. तिथे असलेले लोक माकडाकडे असलेली पैशांची बॅग घेण्याचा खूप प्रयत्न करत होते. माकडाने बॅगमधील नोटांची गड्डी काढली आणि नोटा फाडून झाडाखाली फेकू लागलं होतं.

खैराबाद पोलीस स्टेशन परिसरातील रजिस्टर ऑफिसमध्ये भगवानदीन आपल्या जमिनीची खरेदी करण्यासाठी आले होते. ४ लाख रूपये त्यांना मिळाले होते. ही रक्कम घेऊन ते एका झाडाखाली बसले होते. अशातच अचानक तिथे एक माकडांचा ग्रुप आला. भगवानदीन यांना काही समजायच्या आत एका माकडाने त्यांची बॅग घेतली आणि ते झाडावर चढलं. भगवानदीन आरडा-ओरड करू लागले होते. इतक्यात माकडाने बॅग उघडली. नंतर माकडाच्या हातून पैशांनी भरलेली बॅग खाली पडली. पण एक ५०० ची गड्डी त्याच्याच हाती राहिली.

माकडाने साधारण १० ते १२ हजार रूपये फाडले होते. भगवानदीन नावाच्या या व्यक्तीच्या बॅगमध्ये ४ लाख रूपये होते. खूप प्रयत्नांनंतर माकडाने पैशांनी भरलेली बॅग खाली फेकली. नंतर लोकांनी भगवानदीन यांना पैशांनी भरलेली बॅग परत केली.
 

Web Title: Monkey loot four lakh from elderly man and started throwing currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.