जेव्हा एका माकडामुळे मारले गेले होते २० लोक, झाली होती बॉम्ब आणि गोळ्यांची बरसात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:45 PM2019-09-04T12:45:42+5:302019-09-04T12:48:17+5:30

एका माकडामुळे २० लोक मारले गेले होते, हे ऐकूनच विचित्र आणि आश्चर्यकारक वाटतं. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली होती.

Monkey attack in Libya sparks tribal clashes that kill more than 20 people | जेव्हा एका माकडामुळे मारले गेले होते २० लोक, झाली होती बॉम्ब आणि गोळ्यांची बरसात!

जेव्हा एका माकडामुळे मारले गेले होते २० लोक, झाली होती बॉम्ब आणि गोळ्यांची बरसात!

Next

एका माकडामुळे २० लोक मारले गेले होते, हे ऐकूनच विचित्र आणि आश्चर्यकारक वाटतं. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली होती. दक्षिण लिबीयाच्या सबा शहरात अशी घटना घडली होती. त्यावेळी इथे युद्धाची स्थिती निर्माण झाली होती आणि टॅंकपासून ते रॉकेट लॉंचर आणि बंदुकी चालवल्या गेल्या होत्या. ही घटना घडली होती नोव्हेंबर २०१६ मध्ये.

एका पाळीव माकडाने एका शाळेतील विद्यार्थीनीवर हल्ला केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माकडाने मुलीचा हिजाब खेचला आणि तिला चावला होता. त्यामुळे हे माकड दोन्ही कबिल्यात भांडणाचं कारण ठरलं.

रिपोर्ट्सनुसार, हे माकड तेथील गद्दाफा कबिल्यातील होतं आणि मुलगी औलाद सुलेमान कबिल्यातील होती. जेव्हा या घटनेबाबत मुलीच्या परिवारातील लोकांना कळालं तेव्हा त्यांनी गद्दाफा कबिल्यातील लोकांवर हल्ला केला. 

दोन्ही कबिल्यांत अनेक दिवस भांडण आणि हिंसा सुरू होती. सुरूवातीला तर माकडासह तीन लोकांच्या मृत्युची बातमी समोर आली होती. पण नंतर हिंसा वाढली आणि त्यानंतर त्यात २० लोकांचा मृत्यू झाला. ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. दोन्ही कबिल्यांकडे जड शस्त्रास्त्रे होती, ज्यात  टॅंक आणि रॉकेट लॉंचर यांचाही समावेश होता.

Web Title: Monkey attack in Libya sparks tribal clashes that kill more than 20 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.