मरणाच्या दारात होती मॉडेल ,फॅन्समुळे तिच्या आयुष्यात झाला 'हा' चमत्कार आणि नशीबच पालटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:40 PM2021-09-27T16:40:50+5:302021-09-27T16:41:36+5:30

सोशल मीडिया एखाद्याचे आयुष्य बदलू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वेल्समध्ये राहणारी मॉडेल राहेल हकल. एकेवेळी ती हॉस्पिटलच्या बेडवरून पडून आयुष्याचे शेवटचे दिवस मोजत होती. पण क्रिएटीव्हिटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने तिला एक नवं जीवन मिळालं.

model rachael huckle got new life because of fans and cartoon dresses | मरणाच्या दारात होती मॉडेल ,फॅन्समुळे तिच्या आयुष्यात झाला 'हा' चमत्कार आणि नशीबच पालटलं

मरणाच्या दारात होती मॉडेल ,फॅन्समुळे तिच्या आयुष्यात झाला 'हा' चमत्कार आणि नशीबच पालटलं

Next

सोशल मीडिया एखाद्याचे आयुष्य बदलू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वेल्समध्ये राहणारी मॉडेल राहेल हकल. एकेवेळी ती हॉस्पिटलच्या बेडवरून पडून आयुष्याचे शेवटचे दिवस मोजत होती. पण क्रिएटीव्हिटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने तिला एक नवं जीवन मिळालं. आज ती एक यशस्वी मॉडेल आहे आणि तिच्या गंभीर आजाराशी लढत एक चांगले जीवन जगत आहे. यासाठी तिने एक फारच वेगळा प्रयोग केला.

राहेल एका विचित्र आजाराची शिकार झाली होती. यामुळे ती काही खाऊही शकत नव्हती. या रोगामुळे, तिच्या तोंडात, नाकात, घशात आणि आतड्यात वेदनादायक फोड आले होते, ज्यामुळे ती अन्न चघळू शकत नव्हती किंवा गिळू शकत नव्हती. नोकरी गमावल्यामुळे तिला तिच्यावर योग्य उपचार करता आले नाहीत. राहेल म्हणते, मी रोज सकाळी उठून विचार करायचो की, मी आता मरणार आहे. कधीकधी मला श्वासही घेता येत नव्हता. मी माझा वाढदिवस आणि नाताळच्या सुट्ट्या हॉस्पिटलमध्ये घालवल्या.

राहेल काही खाण्यासही घाबरत होती. तिची अवस्था खूप वाईट झाली होती आणि ती एकदम हाडकुळी झाली होती. तिच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने तिची १० वर्षे वाईट परिस्थितीतून गेली. नंतर कळले की तिला पेम्फिगस नावाचा दुर्मिळ रोग आहे. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी, ती आता बरीच स्टेरॉईड्स आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधे घेते.

दिवसेंदिवस खालावत चाललेल्या स्थितीत तिला ओन्लीफॅन्स नावाच्या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती मिळाली, ज्यात चाहते पैसे देऊन फोटो आणि व्हिडिओ खरेदी करतात. ती म्हणते, 'मी व्हिडिओ गेमच्या पात्रांसाठी पोशाख बनवायला सुरुवात केली आणि त्यांना परिधान करून माझे फोटो येथे टाकण्यास सुरुवात केली.'

द सनच्या रिपोर्टनुसार, ३४ वर्षीय राहेल म्हणते की माझे चाहते, हे असे लोक आहेत ज्यांनी माझा जीव वाचवला. त्यांच्यामुळेच मी आज इतके चांगले आयुष्य जगत आहे. चाहत्यांनी खरेदी केलेल्या फोटोंमधून मला पैसे मिळाले. त्यातून मी एका खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले, ज्यांनी माझे प्राण वाचवले. त्यानंतर मी घर विकत घेतले. मी या प्लॅटफॉर्मवरून दरमहा ४ हजार पौंड (४ लाख रुपयांपेक्षा जास्त) कमवते.

रॅचेल कार्टून कॅरेक्टर आणि काल्पनिक पात्रांसारखे कपडे घालून फोटोशूट करते. चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडतात. राहेल म्हणते, 'माझ्या चाहत्यांनी माझ्यासाठी जे केले त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे, अन्यथा मी माझ्या आयुष्याचा शेवटच्या घटका मोजत असते.

Web Title: model rachael huckle got new life because of fans and cartoon dresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.