एकेकाळी म्हशीचं दूध काढणारा मराठमोळा तरूण झाला PSI, शेतकऱ्याच्या लेकाच्या जिद्दीला सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 10:46 AM2020-03-22T10:46:08+5:302020-03-22T10:57:16+5:30

चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणाऱ्या त्या तरुणाचं नाव आहे विशाल अशोक पवार आहे.

Marathwada farmers son vishal pawar passed mpsc exam MYB | एकेकाळी म्हशीचं दूध काढणारा मराठमोळा तरूण झाला PSI, शेतकऱ्याच्या लेकाच्या जिद्दीला सलाम!

एकेकाळी म्हशीचं दूध काढणारा मराठमोळा तरूण झाला PSI, शेतकऱ्याच्या लेकाच्या जिद्दीला सलाम!

Next

गरीबीच्या परिस्थीतीतूनवर येत स्वचःचं नाव कमावणारी अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. अशाच एका होतकरू मुलाचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येकालाच मोठं होऊन नाव कमवायचं असतं. पण प्रत्यक्षात कृती करणारे खूप कमी लोक असतात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून सुद्धा वर येऊन काहीजण सामाजापुढे आदर्श घालून देत असतात. अशाच एका मुलाच्या जिद्दीची गोष्ट ही आहे. 

MPSC देऊन PSI होणं हे अनेक तरुणांनांना वाटत असतं. मात्र स्पर्धा परिक्षांचा अभ्यास हा संयमाची परीक्षा पाहणारा असतो. आर्थिक परिस्थिती अनुकूल नाही, वडिलांची कोरडवाहू शेती. पाऊस आला तरच शेती होणार, नाहीतर पीक निघत नाही अशी अवस्था. अशा परिस्थितीत मराठवाड्यातल्या एका तरुणाने पोलिसांत जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि PSI होत ते प्रत्यक्षातही उतरवलं. चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणाऱ्या त्या तरुणाचं नाव आहे विशाल अशोक पवार आहे. औरंगाबाद पासून दहा किलोमीटर असणारं बाळापूर हे त्याचं गाव आहे. 

विशालच्या वडिलांची कोरडवाहू शेती होती. त्यामुळे कुटुंबाचा उदनिर्वाह चालवणं कठीण असल्याने विशालच्या वडिलांनी म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय सुरु केला. त्याची जबाबदारी विशालवर होती. म्हशींना चारा घालणं, दूध काढणं, त्याचं वाटप करणं हे काम विशाल करायचा. पण हे करत असताना स्वतःमध्ये जिद्द ठेवत विशालने MPSC चा अभ्यास केला. परिक्षांची तयारी करण्यासाठी विशालने २०१४ मध्ये पुण्याला जाण्याचं ठरवलं. नंतर सुरू झाली त्याची खरी परिक्षा सुरू झाली. ( हे पण वाचा- प्रोफेसरची नोकरी सोडून मासेविक्री करणाऱ्या ‘या’ तरुणाला लोकांनी वेडा म्हणून हिणवलं, पण आता...)

विशालचं  दररोज ९ ते १० तास अभ्यास आणि वाचन करणं चालू होतं. त्याने तब्बल चार वेळा त्याने परीक्षा दिली. त्यात तीन वेळा तो मुख्य परीक्षेपर्यंत जाऊन आला. पण पुढे न जाता माघारी यावं लागलं. अखेर २०१८ मध्ये त्याला यश मिळालं. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखतही पार पडली. त्याचा निकाल नुकताच लागला आणि विशालला चांगलं यश मिळालं. महाराष्ट्रातून तो ४६ वा आला आणि PSI होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं. विशालच्या या कामगिरीबद्दल त्याच्या घरच्यांना त्याचा अभिमान आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : कॅन्सरला दिली होती मात; कोरोनाशीही दोन आठवडे लढला, पण झुंज ठरली अपयशी!)

Web Title: Marathwada farmers son vishal pawar passed mpsc exam MYB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.