वाह रे नशीब! स्वस्तातली लॉटरी केली होती खरेदी, रक्कम घ्यायला गेला तर पायाखालची जमीन सरकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 10:31 AM2021-01-20T10:31:13+5:302021-01-20T10:33:07+5:30

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ग्रीन्सबोरोमध्ये राहणाऱ्या अवैस मोहम्मदने लॉटरीची तीन तिकीटे खरेदी केली होती. पण त्याती दोन तिकीटे वाया गेलीत.

Man misreads lottery ticket then got super cash from headquarter | वाह रे नशीब! स्वस्तातली लॉटरी केली होती खरेदी, रक्कम घ्यायला गेला तर पायाखालची जमीन सरकली!

वाह रे नशीब! स्वस्तातली लॉटरी केली होती खरेदी, रक्कम घ्यायला गेला तर पायाखालची जमीन सरकली!

Next

अमेरिकेत एका व्यक्ती लॉटरी लागली. त्याने या लॉटरीतून दीड लाख जिंकले आहेत. पण तिकीटचा नंबर चुकीचा वाचल्याने त्याला वाटले की, त्याला केवळ १ हजार डॉलरची लॉटरी लागली. मात्र, जेव्हा तो जिंकलेली रक्कम घेण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. कारण त्याला  एक हजार डॉलरची नाही तर १ लाख ५० हजार डॉलरची लॉटरी लागली होती.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ग्रीन्सबोरोमध्ये राहणाऱ्या अवैस मोहम्मदने लॉटरीची तीन तिकीटे खरेदी केली होती. पण त्याती दोन तिकीटे वाया गेलीत. अशात त्याला आशा होती की, तिसऱ्या लॉटरीतून त्याला मोठी रक्कम मिळेल. पण लॉटरी नंबर बघताना काहीतरी गडबड झाल्याने तो नाराज झाला. त्याला वाटलं की, आता या नंबरवर केवळ १ हजार डॉलरच मिळणार आहेत.

मोहम्मद म्हणाला की, त्याने जेव्हा तिकीट पाहिलं तर त्याला वाटलं की, त्याला केवळ १ हजार डॉलर मिळणार आहेत. अशात तो नाराज होत लॉटरीच्या कंपनीत पोहोचला. तेव्हा त्याला डेस्कवरील महिलेने सांगितले की, त्याची मोठ्ठी लॉटरी लागली आहे. तुम्हाला दीड लाख डॉलरची लॉटरी लागली. हे ऐकून अवैसचा विश्वास बसला नाही. त्याला टॅक्स कापून १ लाख १०,८६४ डॉलर मिळाले आहेत. अवैस म्हणाला की, तो या रकमेतून त्याने गहाण ठेवलेली संपत्ती सोडवेल.

अवैस म्हणाला की, भलेही सुरूवात निराश झाली होती. पण त्याने स्वत:ला सांभाळलं आणि स्वत:ला सकारात्मक राहण्यास सांगितलं. त्याने स्वत:ला हे समजावलं की, चांगली वेळ नक्की येईल.
 

Web Title: Man misreads lottery ticket then got super cash from headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.