Mushrif khan recites 500 shloks of geeta : शाब्बास! १२ वर्षांच्या मुशरिफ खाननं पाठ केले भगवद्गीतेचे ५०० श्लोक; लेकीची कामगिरी पाहून आई म्हणाली....

By manali.bagul | Published: March 1, 2021 04:40 PM2021-03-01T16:40:23+5:302021-03-01T17:20:42+5:30

Mushrif khan recites 500 shloks of bhagwad geeta : आधात्मिक ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल तर धर्म या मार्गात बाधा होऊ शकत नाही, हे या घटनेवरून दिसून येतं.

Madhya pradesh 12 year old mushrif khan recites 500 shloks of bhagwad geeta | Mushrif khan recites 500 shloks of geeta : शाब्बास! १२ वर्षांच्या मुशरिफ खाननं पाठ केले भगवद्गीतेचे ५०० श्लोक; लेकीची कामगिरी पाहून आई म्हणाली....

Mushrif khan recites 500 shloks of geeta : शाब्बास! १२ वर्षांच्या मुशरिफ खाननं पाठ केले भगवद्गीतेचे ५०० श्लोक; लेकीची कामगिरी पाहून आई म्हणाली....

Next

मुलांनी एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी  असते.  १२ वर्षांच्या चिमुरडीनं मेमोरी रिटेंशन कोर्ससाठी भगवद्गीतेची निवड केली आहे. आतापर्यंत या मुलीनं भगवद्गीतेचे अनेक श्लोक पाठ केले असून ७०१ ते ५०० श्लोक पाठ करून तिनं लोकांना ऐकवलं आहेत. मेमोरी रिटेंशन टेक्निक शिकण्यासाठी रोहिणीला गणित शिक्षिका रोहिणी मेनन यांनी मदत केली. आधात्मिक ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल तर धर्म या मार्गात बाधा होऊ शकत नाही, हे या घटनेवरून दिसून येतं.

मध्यप्रदेशातील  छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आठवीच्या मुशरिफ खानने एक आदर्श उदाहरण घालून दिलं आहे.  मुशरिफनं गीतेचे ५०० श्लोक पाठ केले आहेत. १२ वर्षााच्या मुशरिफनं मेमोरी रिटेशन कोर्ससाठी भगवद्गीतेची निवड केली आहे. आता मुशरिफ ही भगवद्गीतेच्या ७०१ पैकी ५०० श्लोक आरामात म्हणून दाखवू शकते. 

रोहिणी मेनन यांनी  दिलेल्या माहितीनुसार मेमरी रिटेंशनसाठी मुशरिफनं भगवद्गीतेची निवड केली होती. इयत्ता सहावीपासून तिनं हे श्लोक पाठ करायला सुरूवात केली होती आणि बघता बघत तिनं ५०० श्लोक म्हणून दाखवण्याचा विक्रम केला आहे.  श्लोक पाठ करण्याबरोबरच तिला याचा अर्थही समजून घ्यायचा आहे. 

मुशरिफनं सांगितले की, ''या शॉर्ट कोर्सच्या निमित्ताने मी काहीतरी वेगळं करू इच्छित होती.  त्यासाठी मी भगवद्गीतेची निवड केली.  माझ्या आई बाबांनीही मला  भगवद्गीता वाचण्याची परवानगी दिली. जेणेकरून मला प्रत्येक धर्माची माहिती मिळेल. कुरआन, गीता, बायबल एकच संदेश  देतात. मानवता हाच सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. '' आपल्या मुलीच्या या कामगिरीवर  आई वडिल खूप खुश आहेत.आश्चर्य! २५६ वर्ष जगलेल्या माणसाला होती २०० मुलं; एक दोन नाही तर २३ जणींशी केलं लग्न.....

मुशरिफची आई जीनत खानने सांगितले की, ''माझ्या मुलीनं मेहनत केली त्याचे योग्य फळ  तिला मिळाले . या माध्यमातून तिनं एकात्मता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणापासून या गोष्टींना लांब ठेवणं  योग्य ठरेल तसंच  कोणताही वेगळा रंग देऊ नये.''

Read in English

Web Title: Madhya pradesh 12 year old mushrif khan recites 500 shloks of bhagwad geeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.