सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 01:08 PM2021-01-14T13:08:10+5:302021-01-14T13:08:33+5:30

प्रेम मुळात कुणीही कुणावर करू शकतं. राजकारणी देखील शेवटी माणसंच आहेत. ही पहिली वेळ नाही की, राजकीय व्यक्तीच्या प्रेम प्रकरणावर जोरदार चर्चा होतीय. 

Love stories of Indian political leaders | सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

googlenewsNext

प्रेम मुळात कुणीही कुणावर करू शकतं. राजकारणी देखील शेवटी माणसंच आहेत. त्यांनाही मन आहे आणि तेही प्रेम करू शकतात. राजकीय व्यक्तींच्या प्रेम प्रकरणावर नेहमीच जोरदार चर्चा होत असते. भारतीय नेत्यांचे अनेक प्रेम प्रकरणे आधीही खूप गाजलीत आजही त्यांवर चर्चा होते. काहींनी लपून प्रेम केलं तर काहींनी बिनधास्तपणे प्रेम केलं. अशाच काही राजकीय लोकांच्या लव्हस्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या लव्हस्टोरी नेहमीच मीडियात चर्चेचा विषय बनल्या.

सचिन पायलट-सारा अब्दुल्ला

सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांची लव्हस्टोरी आंतरजातीय विवाहामुळे तर चर्चेत होतीच. पण सोबत दोन्ही परिवार हे भारतीय राजकारणातील शिखरावर होते. लंडनमध्ये शिकत असताना सचिन पायलट यांची भेट सारा अब्दुल्ला यांच्यासोबत झाली होती. सारा यांचे भाऊ उमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. अब्दुल्ला परिवार या नात्या विरोधात होता. मात्र पायलट परिवाराने साराला सून म्हणून स्वीकारलं. लग्नानंतर सचिन पायलट हे राजकारणात आले. तेव्हा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी सचिन पायलट यांना जावई म्हणून स्वीकारलं.

दिग्विजय सिंह-अमृता राय

कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि त्यांची दुसरी पत्नी न्यूज अॅंकर अमृता राय यांचं नातं फार जास्त चर्चेत होतं. त्यांचे काही खाजगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. असं असलं तरी हे खरं आहे की कायदा किंवा सामाजिक नियमांनुसार त्यांच्या संबंधात काही चूक नव्हतं. आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दिग्विजय सिंह अमृताच्या जवळ आले आणि दोघांनी लग्न केलं. दोघांमधील वयाचं अंतरही चर्चेचा विषय ठरलं होतं.

राजीव गांधी-सोनिया गांधी

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची लव्हस्टोरी राजीव गांधी राजकारणात येण्याआधीच पूर्ण झाली होती. इटलीच्या सोनिया माइनो भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मोठा मुलगा राजीव गांधी यांना कॅंब्रिज यूनिव्हर्सिटीत भेटल्या होत्या. इथेच दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. सोनिया आजही त्यांच्या प्रेमाला जगातली सर्वात सुंदर गोष्ट मानतात.

चांद मोहम्मद-फिजा मोहम्मद

ही कदाचित एकुलती एक अशी लव्हस्टोरी असेल जी भारतीय मीडियात सर्वात जास्त चर्चेत होती. राजकीय लोकांच्या लव्हस्टोरींचा इतिहास या लव्हस्टोरीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. हरयाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन आणि व्यवसायाने वकिल असलेल्या अनुराधा बाली एकमेकांच्या प्रेमात पडले. आधीच विवाहित असलेल्या चंद्रमोहन यांनी धर्म बदलून आपलं नाव चांद मोहम्मद ठेववलं तर अनुराधा झाल्या फिजा मोहम्मद. नंतर दोघांनी लग्न केलं. पुढे काही कारणाने चांद यांनी फिजाला सोडलं आणि पुन्हा चंद्रमोहन झाले. पेज थ्री पर्सनॅलिटी बनलेल्या फिज यांनी काही टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आणि एक दिवस त्या त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या.

अखिलेश यादव-डिंपल यादव  

ही राजकारणातील सर्वात सुंदर आणि सर्वात लो प्रोफाइल लव्हस्टोरी आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. ऑस्ट्रेलियातून शिकून परतल्यावर अखिलेश यांची भेट डिंपल यांच्यासोबत लखनौ विश्वविद्यालयात एका कार्यक्रमात झाली.  डिंपल तिथे शिकत होत्या. या भेटीत त्यांची मैत्री झाली आणि पुढे दोघात प्रेम झालं. मुलायम सिंह यादव आधी या नात्यासाठी तयार नव्हते. पण नंतर दोन्ही परिवार तयार झाले आणि दोघांनी लग्न केलं.

शशी थरूर - सुनंदा पुष्कर

या दोघांची लव्हस्टोरीची चर्चा भारतीय मीडियात सर्वात जास्त रंगली. उद्योजिका सुनंदा पुष्कर यांच्यासोबतच्या लव्हस्टोरीमुळे शशी थरूर यांना राजीनामा द्यावा लागला होता. दोघांची जोडी फारच सुंदर दिसत होती. पण पुढे त्यांच्यात काही वाद झाले आणि दोघे वेगळे झाले. एक दिवस एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. त्यांनी अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. 
 

Web Title: Love stories of Indian political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.